महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोकण किनारपट्टीवर एलईडी दिव्याच्या साहाय्याने अनधिकृत मासेमारी करणाऱ्या १२ बोटीवर कारवाई - मच्छिमार

कारवाईत बेकायदा मासेमारीसाठी वापरले जाणारे लाखो रूपयांचे साहित्‍य जप्‍त करून 12 बोटींवर कारवाई करण्‍यात आली आहे.

अनधिकृत मासेमारी करणाऱ्या बोटीवर कारवाई

By

Published : May 6, 2019, 11:28 AM IST

रायगड- कोकण किनारपट्टीवर एलईडी दिव्‍यांच्‍या सहाय्याने तसेच अन्‍य प्रकारे सुरू असलेल्‍या अनधिकृत मासेमारी विरोधात मत्‍स्‍य व्‍यवसाय विकास विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. आज मांडवा येथे भर समुद्रात केलेल्‍या कारवाईत बेकायदा मासेमारीसाठी वापरले जाणारे लाखो रूपयांचे साहित्‍य जप्‍त करून 12 बोटींवर कारवाई करण्‍यात आली आहे.

कोकण किनारपट्टीवर एलईडी दिव्याच्या साहाय्याने अनधिकृत मासेमारी करणाऱ्या बोटीवर कारवाई करताना


आधीच मासळीचा दुष्‍काळ असताना एलईडी तसेच पर्ससीन मासेमारीमुळे छोटे मच्‍छीमार हवालदिल झाले आहेत. अनेकांवर उपासमारीची पाळी आली आहे. याविरोधात अनेक आंदोलने झाली. त्‍यानंतर मत्‍स्‍य व्‍यवसाय आयुक्‍त अरूण विधळे, सहआयुक्‍त सागरी राजेंद्र जाधव यांनी धडक कारवाइचे आदेश दिले. त्‍यांनतर आता मत्‍स्‍यव्‍यवसाय विकास विभागाने पावले उचलली आहेत.


अलिबागजवळच्‍या मांडवा समुद्रात आज रायगडचे सहायक आयुक्‍त अभयसिंग शिंदे इनामदार व परवाना अधिकारी स्‍वप्‍नील दाभणे यांनी आपल्‍या नियमित गस्‍तीपथकासह स्‍वतः कारवाईत भाग घेतला. यावेळी 16 बोटींची तपासणी केली. यातील एका बोटीवर 13 एलईडी पॅनल, 2000 वॅटचेचे 4 बल्‍ब, 3 महागडे सबमर्सिबल बल्‍ब, फिशींग लॅब बलास्‍ट, वायरींग, बटणं असे लाखो रूपयांचे साहित्‍य हस्‍तगत करण्‍यात आले. हे साहित्‍य समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्‍या बोटींना पुरवण्‍यासाठी नेण्‍यात येत होते.


याशिवाय पर्ससीन मासेमारी करणाऱ्या 8 बोटींवर कारवाई करून जाळी जप्‍त करण्‍यात आली. ट्रॉलींगव्‍दारे बेकायदा मासेमारी 3 बोटींवरदेखील कारवाईचा बडगा उचलण्‍यात आला आहे. या संपूर्ण कारवाईत लाखो रूपयांचे साहित्‍य हस्‍तगत करण्‍यात आले. एलईडी तसेच पर्ससीन मासेमारी विरोधात स्‍थानिक पारंपारीक मच्‍छीमारांनी अनेकदा आवाज उठवत मासेमारी बंद ठेवत आपला निषेध व्‍यक्‍त केला होता.


लोकसभा निवडणूकीच्‍या काळातदेखील या विषयावर बरीच चर्चा झाली होती. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी यासंदर्भात थेट केंद्रीय मंत्र्याशी चर्चा करून लक्ष घालण्‍याची विनंती केली होती. आता मत्‍स्‍यव्‍यवसाय विकास विभागाच्‍या या कारवाईमुळे बेकायदा मासेमारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. तसेच पारंपारीक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या छोटया मच्‍छीमारांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details