रायगड - राममंदिर बांधून जर कोरोना जाणार नसेल, तर बकरी ईदला कुर्बानी दिल्याने कोरोना जाणार आहे का, असा प्रश्न विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे राज्यात बकरी ईद वरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असा सामना रंगणार असल्याचे चित्र आहे. राज्यात सगळ्या धर्मियांना एकच कायदा आणि नियम असताना राज्य सरकार मुस्लिम धर्मियांच्या सणाला सूट का देत आहे, असा सवालही यानिमित्ताने दरेकर यांनी उपस्थित केला आहे.
रोहा येथील तांबडी गावात झालेल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या शारीरिक अत्याचाराच्या प्रकरणाबाबत दरेकर यांनी पीडितेच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यावेळी बकरी ईद बाबत सुरू असलेल्या गदारोळाबाबत प्रश्न विचारल्यानंतर दरेकरांनी मत मांडले. कोविड-19 असताना हिंदू कोरोनाच्या असलेल्या नियमांचे पालन करून सण साजरे करत आहेत. राज्यात सर्वांना कायदे, नियम एकच असताना इतर धर्मीयांनाही वेगळे नियम करणे हे चुकीचे आहे.
'राम मंदिर बांधून कोरोना जाणार नसेल, तर कुर्बानी देऊन जाणार का?' - rape in raigad
राममंदिर बांधून जर कोरोना जाणार नसेल, तर बकरी ईदला कुर्बानी दिल्याने कोरोना जाणार आहे का, असा प्रश्न विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे राज्यात बकरी ईद वरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असा सामना रंगणार असल्याचे चित्र आहे.
सरकार म्हणून मंत्री नियम जाहीर करतात; आणि बाळासाहेब थोरात वेगळे बोलतात. नवाब मलिक वेगळे बोलत आहेत. शरद पवार वेगळे बोलत आहेत,असे दरेकर म्हणाले. राज्य सरकार नियम लावत असताना काढलेल्या परिपत्रकात बकरी ईद शक्यतो साधेपणाने साजरी करा, अन्यथा तुमच्या पद्धतीने साजरी करा अशी विसंगती परिपत्रकात असल्याचे गरेकरांनी अधोरेखित केले. त्यामुळे सरकारने कोणाच्या दबावाखाली किंवा राजकारणाला बळी पडू नये, असे दरेकर यांनी म्हटले आहे. सरकार हतबल झाल्याची टीकाही त्यांनी केलीय.