रायगड- जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाने दमदार सुरुवात केली. त्यानंतर शेतकऱ्यांनाही भात लावणीच्या कामाला सुरुवात केली. जिल्ह्यातील नद्या, धरणेसुद्धा तुडूंब वाहू लागल्या आहेत. मात्र, चार दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात दडी मारल्याने उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांसह शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहेत.
पावसाने जून महिन्यात जोरदार सुरुवात केली. त्यानंतर रायगडकर पावसामध्ये चिंब झाले होते. पावसाने अंबा, सावित्री, उल्हास, या नद्याही तुडुंब वाहू लागल्याने काही प्रमाणात जिल्ह्यात पूर परिस्थितीही निर्माण झाली होती, अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटनाही घडल्या होत्या. तसेच जिल्ह्यातील धरणेही पूर्णपणे भरली आहेत.