महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प

चिपळूण येथे मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी सातारा येथील एनडीआरएफ टीम बचाव कार्यासाठी निघाली होती. मात्र, दरड कोसळून रस्ता बंद झाल्याने एनडीआरएफ पथक अडकून पडले आहे. त्यामुळे चिपळूणच्या बचाव कार्याला उशीर होण्याची शक्यता आहे.

पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात दरड कोसळली

By

Published : Aug 5, 2019, 8:45 PM IST

रायगड- पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटामध्ये सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दाभिल गावाच्या हद्दीत रस्त्यावर मोठी दरड कोसळली. त्यामुळे मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर आला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या ठिकाणी दोन्ही बाजूने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग महाड, यांनी दरड हटवण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, दरड काढण्यास 5 ते 6 तास लागण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी पोलादपूरच्या शिवाजी चौक येथे बॅरिकेट्स लावून वाहतूक बंद केली आहे. दरम्यान, चिपळूण येथे मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी सातारा येथील एनडीआरएफ टीम बचाव कार्यासाठी निघाली होती. मात्र, दरड कोसळून रस्ता बंद झाल्याने एनडीआरएफ पथक अडकून पडले आहे. त्यामुळे चिपळूणच्या बचाव कार्याला उशीर होण्याची शक्यता आहे.

दरड कोसळण्याची माहिती मिळताच पोलीस व महाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जेसीबीच्या सहाय्याने मातीचा ढिगारा काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, रस्ता पूर्ववत होण्यास 5 ते 6 तास लागण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details