रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर जवळ कशेडी घाटात धामणदिवी येथे दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सायंकाळी 7.30 वाजता दरड कोसळली. जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचे काम सुरू असून एकेरी वाहतूक सुरू झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळली; एकेरी वाहतूक सुरु
कशेडी घाटात धामणदिवी येथे असलेल्या डोंगरातील दरड कोसळून मुंबई-गोवा महामार्गावरआल्याने वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. एका बाजूची दरड हटवून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
दरड हटवण्याचे काम सुरु
दरड कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस व महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनतर जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले.
महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू असून दरडीचा पडलेला मातीचा ढिगारा काढल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.