महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खंडाळा घाटातील मंकी हिल भागात कोसळलेली दरड हटवली; पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा पूर्ववत

खंडाळा घाटातील मंकी हिल भागात कोसळलेली दरड हटवली असून पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा पूर्ववत होत आहे. मुंबईहून हैदराबाद आणि चेन्नईकडे जाणाऱ्या गाड्या उशिराने धावत आहेत.

रेल्वे मार्गावर कोसळलेली दरड

By

Published : Jul 8, 2019, 6:04 PM IST

Updated : Jul 8, 2019, 7:46 PM IST

मुंबई-खंडाळा घाटात मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर मंकी हिल येथे कोसळलेली दरड 3 वाजून 45 मिनिटांनी हटवण्यात आली. यानंतर पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा पूर्ववत होत आहे.

रेल्वे मार्गावर कोसळलेली दरड

या घटनेत दोन मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरड हटवल्यानंतर डाऊन आणि मिडल लाईनवरील बंद झालेली रेल्वे वाहतूक पूर्ववत होत आहे.

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याची ही चौथी घटना आहे. दरड कोसळल्याने पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक सेवा काही वेळ ठप्प झाली होती.

मुंबई-हैदराबाद आणि मुंबई-एलटीटी चेन्नई या दोन एक्सप्रेस गाड्या उशिराने धावत आहेत. मात्र, सीएसएमटीकडे येणाऱ्या उपनगरीय मार्गावरील वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही.

Last Updated : Jul 8, 2019, 7:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details