महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात पुन्हा कोसळली दरड; दीड तासानंतर वाहतूक सुरळित

मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोळई येथे दरड कोसळली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली होती. प्रशासनाने दीड तासामध्ये मातीला हटवून वाहतूक सुरळित केली आहे.

चोळई येथे कोसळली दरड

By

Published : Aug 3, 2019, 8:03 AM IST

Updated : Aug 3, 2019, 9:19 AM IST

रायगड- मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती. कोसळलेली दरड दीड तासामध्ये बाजूला सारून वाहतूक सुरळित करण्यात आली. पोलादपूर पोलीस स्टेशन हद्दीमधील मौजे चोळई येथे ही घटना सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली आहे. याच महामार्गावर शुक्रवारीही कशेडी घाटातील धामणदेवी येथे दरड कोसळली होती.

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात पुन्हा कोसळली दरड

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात मौजे धामणदेवी येथील रस्त्यावर शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता दरड कोसळली होती. ही दरड मध्यरात्री साडेतीन वाजेपर्यंत काढण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र शनिवारी सकाळी सात वाजता पुन्हा मौजे चोळई येथे मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने मुंबई गोवा महामार्ग बंद करण्यात आला. मातीचा ढिगारा काढण्याचे काम सुरू करण्यात आले.

मुबंई गोवा महामार्गावर सध्या दरड कोसळण्याच्या घटना वाढत आहेत. कशेडी घाटामध्ये रोज कुठे ना कुठे दरड कोसळण्याच्या घटना घडत असते. मुंबई-गोवा महामार्गावर काल 2 ऑगस्ट रोजी मौजे धामणदेवी येथे दरड कोसळली होती. त्यामुळे पाच ते सहा तासाने रस्त्यावरील माती काढल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू झाला. त्यावेळी वाहतूक तुळशीखिंडीतून महाड अशी वळविण्यात आली होती. मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळली असल्याचे समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मातीचा ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले.

Last Updated : Aug 3, 2019, 9:19 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details