महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Landslide At Ambenali Ghat : आंबेनळी घाटातील कालिका पाँईटजवळ दरड कोसळली, दोन्ही बाजुची वाहतूक बंद - पोलादपूर महाबळेश्वर महामार्ग वाहतुकीसाठी बंद

महाबळेश्वर पोलादपूर महामार्गावर आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. या महामार्गावरील वाहतूक पूर्णपण ठप्प झाली आहे. त्यामुळे कोकणात या महामार्गाने जाणाऱ्या प्रवाशांनी ताम्हीनी घाटाचा वापर करण्याच्या सूचना वाहतूक विभागाने दिल्या आहेत.

Landslide At Ambenali Ghat
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jun 28, 2023, 9:46 AM IST

रायगड : आंबेनळी दरीत कालिका पाँईटजवळ दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपण बंद झाली आहे. ही घटना रात्री अकरा वाजता घडली आहे. दरड कोसळल्याने रस्ता पूर्णपणे खचून दरीत कोसळला आहे. त्यामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सध्या विस्कळित झालेली वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र दोन्ही दिशेकडील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

पोलादपूर महाबळेश्वर महामार्ग बंद :आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने या महामार्गावरील वाहतूक पूर्णपण बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर मोठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. पोलादपूर महाबळेश्वर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने ताम्हणी घाटाचा वापर करण्याचा वाहतूक विभागाने सल्ला दिला आहे.

दरड कोसळल्याने रस्ता खचला :आंबेनळी घाटात सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आंबेनळी घाटातील दरड कोसळून एका बाजुचा रस्ता पूर्णपणे खचला आहे. रस्ता खचून तो दरीत पडल्याने वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे आंबेनळी घाटात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. दोन्ही बाजुचा रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याने वाहन चालकांना अडकून पडावे लागले आहे. दरड हटवण्याचे काम सद्या युद्धपातळीवर सुरू आहे.

दरड कोसळण्याच्या घटना वाढल्या :पावसाळा सुरू झाला असला, तरी राज्यात अद्यापही मोठा पाऊस सुरू झाला नाही. मात्र आंबेनळी घाटात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे पोलादपूर ते महाबळेश्वर मार्गावर असलेल्या घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. पावसाळ्यात या मार्गावरुन प्रवास करणे मोठे धोकादायक ठरते. त्यामुळे नागरिकांनी कोकणात जाताना पुरेशी खबरदारी घेऊनच प्रवास करण्याचा सल्ला वाहतूक विभागाकडून देण्यात येत आहे.

पोलादपूरपासून 40 किमीचा घाट :रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी हा घाट आहे. जावळीच्या घनदाट अरण्यातील हा मोठा धोकादायक घाट असल्याचे बोलले जाते. पोलादपूर ते महाबळेश्वर महामार्गावर दोन मोठे घाट लागतात. त्यात आंबोनळी हा सगळ्यात मोठा घाट आहे. या घाटाची लांबी तब्बल 40 किमी आहे. त्यामुळे वाहन चालकाला या घाटात मोठी खबरदारी घेत वाहन चालवावे लागते.

हेही वाचा -

  1. कशेडी घाटात कोसळली दरड; मुंबई-गोवा महामार्ग राहणार रात्रभर बंद
  2. कसारा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली, वाहतूक धिम्या गतीने
  3. Raghuveer Ghat: रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूचं; रघुवीर घाटात दरड कोसळली

ABOUT THE AUTHOR

...view details