महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्मृतीवन आणि पक्षी संग्रहालय साकारणारी कुरुळ ग्रामपंचायत जिल्ह्यात पहिलीच - Memorial and Bird Museum in Kurul

अलिबाग शहराला लागून असलेल्या कुरुळ ग्रामपंचायतीने पर्यटन वाढीसाठी १६ हेक्टर वनीकरण विभागाच्या जमीनीत स्मृतीवन आणि आंतराष्ट्रीय पक्षी संग्रहालय प्रकल्प हाती घेतला आहे. या साठी संबधीत विभागला जमीन ग्रामपंचायतीला देण्याबाबतची कारवाई पूर्ण करण्याचे आंदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

kurul-gram-panchayat-in-raigad-district-to-construct-a-memory-house-and-bird-house-in-district
स्मृतीवन आणि पक्षी संग्रहालय साकारणारी कुरुळ ग्रामपंचायत जिल्ह्यात पहिलीच

By

Published : Jan 4, 2020, 10:07 PM IST

रायगड :अलिबाग शहराला लागून असलेल्या कुरुळ ग्रामपंचायतीने पर्यटन वाढीसाठी पावले उचलली आहेत. ग्रामपंचायत हद्दीत रासायनी टेकडीवर असलेल्या सामाजिक वनीकरण विभागच्या 16 हेक्टर जमिनीवर स्मृतीवन आणि आंतरराष्ट्रीय पक्षी संग्रहालय प्रकल्प हाती घेतला आहे. सामाजिक वनीकरणाची 16 हेक्टर जागा प्रकल्पासाठी ग्रामपंचायतीला देण्याबाबतची कारवाई पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. स्मृतीवन आणि पक्षी संग्रहालय उपक्रम राबवणारी कुरुळ ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरणार आहे. या प्रकल्पामुळे कुरुळ मधील पर्यटन वाढीस मदत मिळणार आहे. कुरुळ ग्रामपंचायतीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरपंच अॅड. जनार्दन पाटील यांनी दिली. यावेळी उपसरपंच स्वाती पाटील, सदस्य मनोज ओव्हाळ आणि इतर सदस्य उपस्थित होते.

स्मृतीवन आणि पक्षी संग्रहालय साकारणारी कुरुळ ग्रामपंचायत जिल्ह्यात पहिलीच


सामाजिक वनीकरण विभागाला कुरुळ ग्रामपंचायत हद्दीतील स. नं 49/1 ही 16 हेक्टर जागा स्मृतीवन म्हणून विकसित करण्यासाठी 1998-99 साली देण्यात आली होती. मात्र, सामाजिक वनीकरण विभागाने 20 वर्षात कोणतीही कामे अगर देखभाल केलेली नाही. कुरुळ ग्रामपंचायतीचे सरपंच अॅड जनार्दन पाटील यांनी याबाबत जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांच्याशी संपर्क करून सदर जागा ग्रामपंचायतीला स्मृतीवनासाठी देण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्याकडे सामाजिक वनीकरण विभाग अधिकारी, अलिबाग तहसीलदार, सरपंच यांची एकत्रित बैठक होऊन ही जागा ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. अशी माहिती जनार्दन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

16 हेक्टर जागेवर स्मृतीवन तयार करण्यात येणार असून वाढदिवस, मृत व्यक्तीची आठवण जागृत ठेवण्यासाठी वृक्षरोपण करण्याची संकल्पना आहे. यासाठी दोन हजार रुपये कायमस्वरूपी वृक्ष देखभालीसाठी ग्रामपंचायत घेणार आहे. याच ठीकाणी पक्षी संग्रहालय बनवण्यात येणार असून यामध्ये आंतरराष्ट्रीय पक्षी पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. येणाऱ्या पर्यटकांना झोपडी पद्धतीचे राम, लक्ष्मण, सीता आश्रम वास्तव्यासाठी बनविण्यात येणार आहेत. याठीकानी बगीच्या बनवण्यात येणार आहे. सैन्य दलातील व्यक्तींना व त्याच्या पालकांना मोफत राहण्याची सुविधा गेस्ट हाऊसमध्ये करण्यात येणार आहे.


स्मृतीवन आणि पक्षी संग्रहालय उपक्रम पूर्ण करण्यासाठी एक ते दीड वर्ष कालावधी लागणार असून पन्नास ते साठ लाखाचा खर्च होणार आहे. यासाठी आमदार निधी, फॉरेस्ट टुरिझम निधी, 15 वित्त आयोग, आरसीएफ, व अन्य देणगीदारांच्या मार्फत निधी उभा केला जाणार असल्याचे सरपंच अॅड जनार्दन पाटील यांनी सांगितले. या सर्व प्रकल्पाची देखभाल ही ग्रामपंचायत करणार आहे. फॉरेस्ट टुरिझम माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यामुळे पर्यटक वाढणार असून स्थानिक व्यवसायिकांनाही आर्थिक फायदा होणार आहे. कुरुळ मध्ये माध्यमातून पर्यटन वाढावे यासाठी प्रकल्प हाती घेतला असल्याचे अॅड जनार्दन पाटील यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details