रायगड -कर्जत तालुक्यातील रायगड हॉस्पिटलला कोविड सेंटर म्हणून मान्यता मिळाली आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी कोविड रुग्णालयाचे फित कापून उद्घाटन केले आहे. जोपर्यंत जम्बो कोविड रुग्णालय होत नाही तोपर्यंत रायगड हॉस्पिटलला कोविड हॉस्पिटलचा दर्जा देण्यात यावा, असे निवेदन थोरवे यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना दिले होते.
कर्जतमधील रायगड हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर सुरु - raigarh covid care center
आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकाराने तालुक्यातील रायगड हॉस्पिटलला 100 बेडचे कोविड रुग्णालय म्हणून मान्यता मिळाली आहे. सध्या यामध्ये 10 ICU बेड असून 30 जनरल आणि 30 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत. कोरोनाची परिस्थिती पाहता आज (बुधवारी) या कोविड रुग्णालयाचे उदघाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले.
जगभरात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले असून कोरोनामुळे अनेकांचे प्राण देखील गेले आहे. त्यातच आरोग्यव्यवस्था तोकडी पडत असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होताना दिसत आहे. रायगड जिल्ह्यात देखील कोरोनाच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 17 एप्रिल रोजी जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी कर्जत - खालापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येची झपाट्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तसेच रुग्णांना उपचारासाठी आरोग्य सेवा देखील तोकडी पडत असल्याची खंत व्यक्त केली होती. तसेच तालुक्यात जम्बो कोविड रुग्णालयाची मागणी देखील आमदार यांनी केली होती.
आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकाराने तालुक्यातील रायगड हॉस्पिटलला 100 बेडचे कोविड रुग्णालय म्हणून मान्यता मिळाली आहे. सध्या यामध्ये 10 ICU बेड असून 30 जनरल आणि 30 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत. कोरोनाची परिस्थिती पाहता आज (बुधवारी) या कोविड रुग्णालयाचे उदघाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार महेंद्र थोरवे, रायगड हॉस्पिटलचे संचालक नंदकुमार तासगावकर, डॉ. पाणिनी, भाजपा नेते सुनील गोगटे, राजेश भगत, नगरसेवक संकेत भासे तसेच रायगड हॉस्पिटल चे सर्व डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.