रायगड - कोकण रेल्वे मार्गावर पेण कासु दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक दीड तास ठप्प झाली होती. मात्र, तत्काळ रेल्वे रुळाचे काम पूर्ण करून रेल्वेसेवा सुरळीत करण्यात आली.
रेल्वे पोलिसांनी वाचवले वृद्धाचे प्राण; खेड रेल्वे स्थानकावरील घटना
मुंबईकडून कोकणात जाणाऱ्या रेल्वेमार्गावर मध्य रेल्वेच्या हद्दीत असलेल्या कासु गावाजवळ रेल्वे रुळाला तडे पडले असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यामुळे कोकणातून परराज्यात जाणारी पॅसेंजर रेल्वे कासु येथे थांबविण्यात आली होती. त्यानंतर तातडीने रेल्वे रुळाचे काम सुरू केले. मात्र, काम पूर्ण होईपर्यंत रेल्वेतील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. रेल्वे रूळ व्यवस्थितीत झाल्याने थांबवलेली पॅसेंजर गाडी पुढील प्रवासासाठी सोडण्यात आली.
कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले; खेड रेल्वे स्थानकात प्रवासी संतप्त