महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोकणात पावसाचा रेल्वेला फटका, कोकण रेल्वे वाहतूक बंद

माणगावच्या घोट नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे, खबरदारीचा उपाय म्हणून कोकण रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Kokan railway service stopped due to heavy rain

By

Published : Jul 27, 2019, 1:56 PM IST

रायगड - जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज सकाळी दहा वाजल्यापासून कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.


माणगावच्या घोट नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे, खबरदारीचा उपाय म्हणून कोकण रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
रत्नागिरी-दादर एक्स्प्रेस वीर येथे, दिवा-सावंतवाडी कोलाड येथे, मंगल एक्स्प्रेस करंजाडी येथे तर मांडवी एक्स्प्रेस रोहा येथे थांबविण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details