रायगड - बदलापूर वांगणी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या धर्तीवर कोकण रेल्वे मार्गावर असा प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून, कोकण रेल्वेने पॅसेंजर गाड्या रेल्वे स्थानकांवर थांबविल्या होत्या. यासोबतच माणगावच्या घोट नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने कोकण रेल्वे वाहतूक सकाळी साडेदहा पासून थांबविण्यात आली होती. दुपारी दीड वाजता रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू, सुरक्षेच्या दृष्टीने थांबवल्या होत्या गाड्या - trains were stopped
माणगावच्या घोट नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने कोकण रेल्वे वाहतूक साडे दहा पासून थांबविण्यात आली होती. दुपारी दीड वाजता रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
![कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू, सुरक्षेच्या दृष्टीने थांबवल्या होत्या गाड्या](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3961129-thumbnail-3x2-kokan-rail.jpg)
Kokan railway service started again trains were stopped due to heavy rain
रत्नागिरी-दादर एक्स्प्रेस वीर येथे, दिवा-सावंतवाडी कोलाड येथे, मंगल एक्स्प्रेस करंजाडी येथे तर मांडवी एक्सप्रेस रोहा येथे थांबविण्यात आली होती. मात्र, आता रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू झाली असल्याची माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांनी दिली.