रायगड - कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णाची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा टेस्ट घेण्याची गरज नाही, असे राज्य सरकारने सांगितले आहे. मात्र, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची निगेटिव्ह टेस्ट आली असताना पुन्हा टेस्ट का घेतली असा सवाल उपस्थित करून कोरोना रुग्णाबाबत राज्य शासन दुजाभाव करीत असल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. रायगड जिल्ह्यात ऑक्सिजन सुविधा कुचकामी असून याठिकाणीही रुग्णाच्या मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने ऑक्सिजन टेंट उभारावा अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.
कोरोना टेस्टबाबत राज्य सरकारचा दुजाभाव, किरीट सोमय्यांचा आरोप - कोरोना रायगड न्यूज
कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णाची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा टेस्ट घेण्याची गरज नाही, असे राज्य सरकारने सांगितले आहे. मात्र, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची निगेटिव्ह टेस्ट आली असताना पुन्हा टेस्ट का घेतली असा सवाल उपस्थित करून कोरोना रुग्णाबाबत राज्य सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.
मुंबई तसेच उपनगर शहरातील रुग्णालयात ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे जिल्हा रुग्णालय असून याठिकाणी कोविड सेंटर आहे. मात्र, जिल्ह्यात इतर तालुक्यातही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत. मात्र, याठिकाणी ऑक्सिजन सुविधा नसल्याने रायगडातही कोरोना रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगडातील आरोग्य यंत्रणा ही ढासळलेली आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन टेंट सरकारने उभारण्याची गरज असल्याचे खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.