महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खालापूर पोलिसांनी माजगाव येथे पाच लाखांचा गुटखा केला जप्त - banned gutkha

माजगाव येथे माही किराणा स्टोअर्सवर धाड टाकून सुमारे पाच लाख किमतीचा गुटखा खालापूर पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

gutkha
गुटखा

By

Published : Apr 23, 2021, 8:06 PM IST

रायगड- खालापूर सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. चौक फाटा येथे सापळा रचून गावठी बनावटीचे दोन पिस्तुल व जिवंत काडतूस हस्तगत केल्यानंतर गुरुवारी दुपारी दि.२२ एप्रिल रोजी खालापूर तालुक्यातील माजगाव येथे माही किराणा स्टोअर्स वर धाड टाकून सुमारे पाच लाख किमतीचा गुटखा खालापूर पोलिसांनी हस्तगत केला. ही कारवाई ही संजय शुक्ला उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर यांच्या आदेशाने करण्यात आली.


गुरुवारी डीवायएसपी संजय शुक्ला यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की माजगाव गावाच्या नाक्यावर असणार्‍या माही किराणा स्टोअर्समध्ये शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा, पान मसाला विक्रीसाठी आणला आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळताच डीवायएसपी शुक्ला यांनी पोलीस उपनिरीक्षक मेहबूब तांडेल यांच्या नावे झडती वॉरंट देऊन कारवाईचे आदेश दिला. कारवाई आदेश मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक मेहबूब तांडेल, महिला पोलीस उपनिरीक्षक गायत्री जाधव त्यांची टीम माजगाव येथे रवाना झाली.

खालापूर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी -

सदर ठिकाणी पोलीस गेले असता त्यांनी प्रथम दोन पंचांना बोलून घेतले. त्यानंतर ते माही किराणा स्टोअर्स त्या दुकानात गेले आणि आवाज देऊन एका व्यक्तिला बाहेर बोलावले. त्यांना नाव विचारले असता त्यांनी नरेश लक्ष्मण पाटील (वय 42, रा. माजगाव) असे सांगितले. त्याला दुकानाची दुकानाची झडती घ्यायची असल्याचे सांगून झडती वॉरंट दाखविले व त्यानंतर झडती घेतली. मात्र, काहीही न मिळाल्याने मागील बाजूस असलेल्या गोडाऊनची झडती घ्यायचे पोलिसांनी असल्याचे सांगितले. त्या गोडाउनमध्ये प्रवेश केल्यानंतर गोडाऊनच्या एका कोपऱ्यात किराणा सामनामध्ये सफेद रंगाच्या प्लास्टिकच्या गोण्या दिसून आल्या. त्यामध्ये काय आहे, असे विचारल्यानंतर नरेश लक्ष्मण पाटील यांनी सांगण्यास टाळाटाळ केली. नरेश पाटील हे टाळाटाळ करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने त्यांचा संशय अजून दृढ झाला व त्यांनी गोणी उघडून पाहिले असता त्यामध्ये त्यांना शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा पान मसाला आढळून आला. हा गुटखा पान मसाला कुठून आणला, अशी माहिती विचारले असता त्यांनी ती माहिती देण्यास देखील टाळाटाळ केली. १० गोणीमधून पोलिसांनी एकूण 5 लाख 17 हजार 737 रुपये किमतीचा गुटखा खालापूर पोलिसांनी हस्तगत केला आहे.


नरेश पाटीलविरुद्ध खालापूर पोलीस स्टेशनमध्ये भा. दं. वि. स. कलम 328, 272, 273 सह अन्न नागरी सुरक्षा मानके अधिनियम 2006चे कलम 59प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, खालापूर पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मेहबूब तांडेल, महिला पोलीस उपनिरीक्षक गायत्री जाधव, पोलीस हवालदार धनवी, पोलीस हवालदार नीलेश कांबळे, पोलीस नाईक अमित सावंत, पोलीस शिपाई केंद्रे यांनी ही कारवाई केली.

ABOUT THE AUTHOR

...view details