महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कारसेवक म्हणून 13 दिवस तुरुंगात; किशोर जैन यांनी 'त्या' आठवणींना दिला उजाळा

अयोध्या ही रामाची नगरी असून रामजन्मभूमी आहे. रामजन्मभूमी येथे वादग्रस्त ढाचा होता. त्याठिकाणी भव्य असे राम मंदिर उभे करण्याची मनोकामना प्रत्येक रामभक्तांच्या मनात होती.

kishor jain
किशोर जैन - कारसेवक

By

Published : Aug 4, 2020, 5:58 PM IST

रायगड - अयोध्या येथे भव्य असे राम मंदिर व्हावे, अशी प्रत्येक रामभक्तांची इच्छा होती. रामभक्तांची ही इच्छा आता प्रत्यक्षात साकार होण्यास सुरुवात झाली आहे. 5 ऑगस्टला राम मंदिराचा पायाभरणी शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होत आहे. अयोध्या येथील वादग्रस्त ढाचा पाडण्यासाठी लाखो कारसेवकांनी पुढाकार घेतला होता.

यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला, तर आजही ते दिवस आठवले तरी अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. रायगड जिल्ह्यतूनही हजारो कारसेवक हे अयोध्येकडे रवाना झाले होते. त्यातील एक होते शिवसैनिक किशोर जैन. किशोर जैन यांनी कारसेवक म्हणून सांगितलेला आपला अनुभव...

किशोर जैन - कारसेवक

अयोध्या ही रामाची नगरी असून रामजन्मभूमी आहे. रामजन्मभूमी येथे वादग्रस्त ढाचा होता. त्याठिकाणी भव्य असे राम मंदिर उभे करण्याची मनोकामना प्रत्येक रामभक्तांच्या मनात होती. त्यामुळे तो वादग्रस्त ढाचा पाडण्यासाठी देशात एकच लाट पसरली होती. प्रत्येक राज्यातून कारसेवक म्हणून अयोध्येकडे कूच करत होते.

रायगड जिल्ह्यातूनही हजारो कारसेवक हे अयोध्येकडे निघाले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही निघालो होतो. मात्र, अयोध्येकडे जाण्यापूर्वीच उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक करून तुरुंगामध्ये टाकले. तो अनुभव मी कधीच विसरणार नाही, असे किशोर जैन यांनी सांगितले.

यूपी सरकारने कारसेवकांना अयोध्येत येण्याआधीच शूट करण्याची परवानगी दिली होती. लाखो कारसेवकांना मारून नदीत टाकले होते. आम्हालाही अटक करून तुरुंगामध्ये टाकले होते. मात्र, तिथे झोपण्याची खाण्यापिण्याची कोणतीच सुविधा आम्हाला देण्यात आली नव्हती. बाहेरून कोणी काही आणून दिल्यास ते अन्न शिजवून, कच्च आम्ही खात होतो. ते 13 दिवस कठीण परिस्थितीत काढले. त्यानंतर आम्ही घरी सुखरूप आलो. 5 ऑगस्टला राम मंदिराचा पायाभरणी शुभारंभ होत असल्याने आम्हाला आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया किशोर जैन यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details