खालापूर (रायगड) -3 मे रोजी खालापूर पोलीस ठाणे व कानसा वारणा फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक पाटीलांच्या संयुक्त विदयमाने शिरवली आदिवासीवाडी मधील गरजू, निराधार महिला, जेष्ठ नागरिकांना अन्नधान्य व मास्कचे वाटप करण्यात आले. या जीवनावश्यक साहित्य वाटपाने सर्वांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला.
खालापूर पोलीस ठाण्याकडून दत्तक घेतलेल्या गावातील गरजूंना कानसा वारणा फाऊंडेशनची मोलाची मदत - रायगड पोलीस बातमी
पूर पोलीस पोलीस ठाण्याकडून दत्तक घेतलेल्या गावातील गरजूंना कानसा वारणा फाऊंडेशनने मोलाची मदत दिली आहे. या जीवनावश्यक साहित्य वाटपाने सर्वांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला.
खालापूर पोलीस ठाण्याने पाच गावे दत्तक घेऊन समाजात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमाला अनेकांनी मदतीचा हात देत पोलीस यंत्रणेच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. 3 मे रोजी दत्तक घेतलेल्या शिरवली आदिवासीवाडीमध्ये जीवनावश्यक साहित्य वाटपाबरोबर मास्क वाटप केल्याने येथील बांधवांनी पोलीस ठाण्यातील सर्व पदाधिकारी व कर्मचारी वर्गाचे आभार मानले. शिरवली वाडीतील पोलीस यंत्रणेच्या कामगिरीत मोलाची भूमिका बजावली ती कानसा वारणा फाऊंडेशनचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पाटील यांनी. दीपक पाटील यांनी उचललेल्या खारीच्या वाट्याचे पोलीस निरिक्षक अनिल विभूते यांनी आभार मानून कौतुक करत त्याच्या फाऊंडेशन उल्लेखनीय पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते, पोलिस उपनिरिक्षक स्वप्नील सावंतदेसाई, कानसा वारणा फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक पाटील, खालापूरच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, माजी नगरसेवक तथा शेकाप नेते संतोष जंगम, पोलीस कर्मचारी समीर पवार, जगदीश वाघ, प्रतीक्षा म्हात्रे आदीप्रमुख उपस्थित होते.