रायगड - पनवेलमधील कामोठे गावाने मागील काही दिवसांपासून आपली 'गाव' ही ओळख मागे टाकली आहे. अनेक विकास प्रकल्पांच्या साहय्याने या गावाने स्वत:ची 'नियोजित वसाहत' अशी नवीन ओळख निर्माण केली आहे. याच कामोठे वसाहतीतील नागरिकांनी येत्या लोकसभा निवडणुकीत 'नोटा' पर्याय वापरण्याचे ठरविले आहे.
कामोठेवासिय देणार 'नोटा'ला पसंती, मुलभूत सुविधा नसल्याचा करणार निषेध
पनवेलमधील कामोठे गावाने मागील काही दिवसांपासून आपली 'गाव' ही ओळख मागे टाकली आहे. अनेक विकास प्रकल्पांच्या साहय्याने या गावाने स्वत:ची 'नियोजित वसाहत' अशी नवीन ओळख निर्माण केली आहे. सार्वजनिक सुविधांच्या दुरावस्थेमुळे येथील नागरिकांनी मतदानावेळी 'नोटा' पर्याय वापरण्याचे ठरविले आहे.
मुलभूत सोयी सुविधांच्या अभावी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे येथील नागरिकांचे आहे.कामोठे वसाहतीतील सेक्टर १२ मध्ये मागील अनेक दिवसांपासून प्रत्येक कुटुंबातील सदस्य हा आजारी पडतोय. कुणाला त्वचेचे विकार झालेत, कुणाला डिसेंट्री, तर कुणाला मळमळण्याचा त्रास होतोय. येथील नागरिकांवर आता रग्णालयामध्ये खेटे घालण्याची वेळ आली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत हताश होत येथील नागरीकांनी येत्या लोकसभा निवडणुकीत 'नोटा' पर्यायाला मतदान करण्याचे ठरविले आहे. एकीकडे मतदारांची संख्या वाढावी म्हणून निवडणूक आयोग सतत जनजागृती करत असते. मात्र पालिका आणि सिडको प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कामोठेतील नागरिकांनी मतदानाचा नकाराधिकार अर्थात 'नोटा' पर्याय वापरण्याचा निर्णय घेतला आहे.