रायगड- आपल्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचार्यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. त्याचबरोबर, जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांच्या पदाधिकार्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
रायगड जिल्हा परिषद कर्मचार्यांनी केले एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण - hunger strike
रायगड जिल्हा परिषद अंतर्गत काम करणार्या कर्मचार्यांच्या विविध मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचार्यांनी आज जिल्हा परिषदे सामोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.
रायगड जिल्हा परिषद अंतर्गत काम करणार्या कर्मचार्यांच्या विविध मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करणे. विविध कार्यालयातील मंजूर पदे तात्काळ भरणे. निवृत्तीनंतर मिळणारे निवृत्ती वेतन कर्मचार्यांच्या कुटुंबाला देखील तेवढेच मिळणे, कंत्राटी कामगारांना कायम करणे, कर्मचार्यांचे निवृत्तीचे वय 58 वरून 60 करणे, तसेच चतुर्थश्रेणी कर्मचार्यांचे निवृत्तीचे वय 62 करणे व पाच दिवसांचा आठवडा करणे यासह इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचार्यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदे सामोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलनामध्ये सहभागी झालेले कर्मचारी किरकोळ रजा घेऊनच सहभागी झाले होते, अशी माहिती संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांनी दिली आहे.
जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, कार्याध्यक्ष अशोक कुकलारे, सचिव सुरेश जांभळे, खजिनदार मेघा म्हात्रे, राज्य उपाध्यक्ष जे. एच. पाटील, प्रकाश काळे, सुरेश म्हात्रे, संजय जाधव, प्रफूल पाटील, अमोल खैरनार, सुनिल पाटील, जगदीश कवळे, किशोर घरत आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.