रायगड - राज्य शासनाने डिजिटल माध्यमाचा वापर करत 'शासन आपल्या दारी' ही संकल्पना राबवली आहे. या अंतर्गत अलिबाग तालुक्यातील झिराड ग्रामपंचायतीने डिजिटल ग्रामपंचायत उपक्रमात 'घरोघरी डिजी ग्राम' हे अॅप्लिकेशन तयार केले असून त्याचे लोकार्पण करण्यात आले. झिराड ग्रामपंचायत डिजिटल अॅप्लिकेशन बनवणारी जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.
झिराड गावात जिल्ह्यातील पहिली डिजिटल ग्रामपंचायत - Grampanchayat
या अॅप्लिकेशनमध्ये झिराड ग्रामपंचायत, परिसरातील शाळा, महाविद्यालय, महत्त्वाचे मोबाईल नंबर, शासनाच्या योजना, शेती मालाचा बाजारभाव, हवामान याविषयी माहती दिली आहे. ग्रामपंचायत दवंडी, डिजिटल जाहिराती या सुविधा ग्रामस्थांना अॅप्लिकेशनमधून मिळणार आहेत. तसेच या माध्यमातून एका क्लिकवर प्रत्येक माहिती ग्रामस्थांना प्राप्त होणार आहे.
झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी २ महिन्यांपूर्वी दर्शना भोईर या निवडून आल्या होत्या. भोईर यांनी गुरुवारी झिराड ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारला. त्यानिमित्ताने 'ग्रामपंचायत घरोघरी' या मोबाईल अॅप्लिकेशनचे लोकार्पण त्यांनी केले. यावेळी आमदार पंडित पाटील, चित्रलेखा पाटील, रायगड जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायतमधून ग्रामस्थांना लागणारे दाखले मिळताना अनेकवेळा अडचणी येतात. तसेच शासनाच्या अनेक योजनांची ग्रामस्थांना माहिती नसते. यातूनच झिराड गावातील तरुण सचिन भोईर यांनी डिजिटल अॅप्लिकेशन तयार करण्याची संकल्पना सरपंच दर्शना भोईर यांच्याकडे मांडली. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी दिलीप भोईर यांनी पुढाकार घेतला.
पुणे येथील रिफॉरमिस्ट आयटी सोल्युशन प्रा. लि. कंपनीने हे मोबाईल अॅप्लिकेशन बनवले आहे. यासाठी साधारण ५० हजार रुपये खर्च आला. हे अॅप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. या अॅप्लिकेशनमध्ये झिराड ग्रामपंचायत, परिसरातील शाळा, महाविद्यालय, महत्त्वाचे मोबाईल नंबर, शासनाच्या योजना, शेती मालाचा बाजारभाव, हवामान याविषयी माहती दिली आहे. ग्रामपंचायत दवंडी, डिजिटल जाहिराती या सुविधा ग्रामस्थांना अॅप्लिकेशनमधून मिळणार आहेत. तसेच या माध्यमातून एका क्लिकवर प्रत्येक माहिती ग्रामस्थांना प्राप्त होणार आहे