रायगड -कळंबोली येथील न्यू सुधागड शाळेजवळ आढळलेल्या बॉम्ब प्रकरणाचा नवी मुंबईच्या विशेष तपास पथकाने सतरा दिवसात छडा लावला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने कमीत-कमी वेळेत तीन जणांना अटक करण्यात आली. या कामाबद्दल नवी मुंबईच्या तीन विशेष पथकांचा पोलीस महासंचालकांकडून गौरव करण्यात आला. पथकांना सहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे.
तपासाचे कौशल्य दाखवणाऱ्या तीन पथकांचा सन्मान
कळंबोलीतील न्यू सुधागड शाळेजवळ १६ जूनला एक संशयास्पद पेटी आढळून आली होती. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने या पेटीची पडताळणी केली असता, त्यात कमी तीव्रतेचा बॉम्ब सापडला. याप्रकरणी एटीएस आणि नवी मुंबई गुन्हे शाखेकडून कसून तपास करण्यात आला. कोणत्याही दहशतवादी संघटनेशी याचा संबंध नसल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा- राष्ट्रवादीच्या बैठकीत 50 आमदार उपस्थित; राजकीय घडामोडींना वेग
त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 17 दिवसात या गुन्ह्याची उकल करण्यात नवी मुंबईच्या तीन विशेष पथकांना यश आले. पोलिसांनी सुशील साठे, मनीष भगत, दीपक दांडेकर या आरोपींना अटक केली. या आरोपींचा शोध लावण्यात विजय कादबाने, संदिपान शिंदे या अधिकार्यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त कोंडीराम पोपेरे, अजय कुमार लांडगे यांच्यासारखे अनुभवी अधिकारीही या तपास पथकात होते.
हेही वाचा- शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची सर्वोच्च न्यायालयात धाव; शपथविधी घटनाबाह्य असल्याचा आरोप
निवृत्ती कोल्हटकर, शिरिष पवार, राहुल राख, रूपेश नाईक, राजेश गज्जल, सुधिर निकम, विजय चव्हाण, संदीप गायकवाड, भुषण कापडणीस, योगेश वाघमारे, राणी काळे, योगेश देशमुख, नितीन शिंदे हे अधिकारी आणि हेमंत सूर्यवंशी, स्नेहल जगदाळे, मंगल गायकवाड, राजेश सोनवणे, बाबाजी थोरात, अनिल यादव, प्रकाश साळुंखे, उमेश नेवारे, वैभव शिंदे, मनोज चौधरी, उमेश ठाकूर, सचिन टिके या पोलीस कर्मचार्यांनी या प्रकरणाच्या तपासात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली.
या प्रकरणात पकडलेल्या आरोपींना एका बिल्डरकडून खंडणी हवी होती. त्यामुळेच बिल्डरच्या घराजवळ हा बॉम्ब पेरण्यात आला असल्याचे तपासात स्पष्ट झाले. पोलिसांच्या तीन पथकांच्या कामगिरीची दखल पोलीस दलाने घेतली.