महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खालापूर शहरात डिझेल शवदाहिनीचे भूमीपूजन - रायगड पालकमंत्री आदिती तटकरे न्यूज

रायगड जिल्हाच्या पालकमंत्री आदिती सुनिल तटकरे, खासदार श्रीरंग बारणे ह्यांच्या हस्ते खालापूर येथे डिझेल शवदाहिनीचे भूमीपूजन करण्यात आले. यासाठी 91 लाख 35 हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.

RAIGAD
रायगड

By

Published : May 3, 2021, 4:57 PM IST

रायगड -रायगड जिल्हाच्या पालकमंत्री आदिती सुनिल तटकरे, खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आज (3 मे) खालापूर येथे प्रस्तावित डिझेल शवदाहिनीचे भूमीपूजन करण्यात आले.

कोरोना रुग्ण मृत्यूमुखी पडल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या काळात कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांना इलेक्ट्रिक व डिझेल शवदाहिनीद्वारे जाळण्यात येत आहे.

खालापूर शहरात डिझेल शवदाहिनीचे भूमीपूजन

91 लाख 35 हजार निधी मंजूर

खालापूर शहरासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी डिझेल शवदाहिणीची मागणी केली होती. त्यानुसार डिझेल शवदाहिनीसाठी निधी मंजूर झाला. त्यानंतर 3 मे रोजी डिझेल शवदाहिनीचे भूमीपूजन पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे यांच्याहस्ते पार पडले. या शवदाहिनीसाठी जवळपास 91 लाख 35 हजार रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

हेही वाचा -साक्षीदार खोटे असू शकतात, परिस्थिती नव्हे - मुंबई उच्च न्यायालय

हेही वाचा -म्हाडा उभारणार सोमय्या मैदानावर 1200 बेडसचे जम्बो कोविड सेंटर, आठवड्याभरात कामाला सुरुवात

ABOUT THE AUTHOR

...view details