रायगड - महाड शहराला कालपासून पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली असून एनडीआरएफ, कोस्टल गार्ड व सैन्य दलाने मदतकार्य करून पुरात अडकलेल्या २५० जणांना सुखरूप स्थळी हलवण्यात आले आहे. मात्र, महाडमध्ये सध्या पूर ओसरला असला तरी सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
महाडमधील पूर ओसरला, मात्र सावित्रीने ओलांडली धोक्याची पातळी - ndrf teem raigad
महाड शहराला कालपासून पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली असून एनडीआरएफ, कोस्टल गार्ड व सैन्य दलाने मदत कार्य करून पुरात अडकलेल्या २५० जणांना सुखरूप स्थळी हलवण्यात आले आहे. मात्र, महाडमध्ये सध्या पूर ओसरला असला तरी सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
ऑगस्ट २०१६ साली सावित्री नदीचा रुद्रावतार पाहायला मिळाला होता. या नदीवरील जुना पूल ढासळून बस गाडी आणि इतर मोटारी वाहून गेल्या होत्या. बरेच लोक बेपत्ताही झाले होते. या पार्श्वभूमीवर अजुन एकदा सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नागरिक चिंतेत आहेत. जिल्ह्यात माणगाव, श्रीवर्धन, तळा, महाड या दक्षिण तालुक्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफ, कोस्टल गार्ड व सैन्य दलाला मदतीसाठी पाठवल्याने आता परिस्थिती पूर्ववत झाली आहे.
महाडमध्ये एनडीआरएफच्या ३ बोटी व २४ जवान, कोस्ट गार्डची १ बोट ४७ जवान, इडियन आर्मीचे ३ बोटी व ५५ जवान आणि वल्ड वेस्ट अॅडव्हेंचर, कोलाड यांच्या १८ बोटी व २५ लोक व स्थानिक नागरिकांच्या मदतीने जिल्हाप्रशासनाने बचावाचे कार्य पोहचून २५० लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.