महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नेरळमध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने मित्रानेच केली मित्राची हत्या; दोघांना अटक - friend killed his friend in neral

नेरळ-रेल्वे स्थानक परिसरात गटाराच्या नाल्यात सुटकेसमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली होती. या हत्येचा तपास नेरळ पोलिसांनी 24 तासात लावला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

crime
आरोपी

By

Published : Dec 18, 2020, 3:24 PM IST

रायगड - नेरळ-रेल्वे स्थानक परिसरात गटाराच्या नाल्यात सुटकेसमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली होती. या हत्येचा तपास नेरळ पोलिसांनी 24 तासात लावला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. चार्ल्स माडर (41), सलोमी पेडराई (31) असे अटक केलेल्या व्यक्तीची नावे आहेत. सुशीलकुमार सरनाईक (31) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृत व्यक्तीने आरोपीच्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेतल्याने निर्घृण हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने मित्रानेच केली मित्राची हत्या

16 डिसेंबर रोजी केली हत्या

16 डिसेंबर रोजी नेरळ लोकोशेड येथे एका अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते सुटकेसद्वारे गटारात टाकले होते. या घटनेनंतर नेरळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन मृतदेहाचा पंचनामा करून धागेदोरे शोधण्यास सुरुवात केली. मृत व्यक्तीस हत्याऱ्याने मारण्यासाठी वापरलेले साहित्य हे काही अंतरावर पोलिसांना एका प्लास्टिक पिशवत मिळून आले होते. तर मद्याच्या बाटल्या आणि इतर साहित्यही सापडले होते. त्यानंतर पोलिसांनी या हत्येचा शोध सुरू केला

आरोपीच्या घरात मिळाला पुरावा

पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी सात पथक तयार केली. खबऱ्याकडून आरोपी हा नेरळ राजबाग येथे राहत असल्याची पोलिसांना खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पथक पाठवून आरोपीला पकडण्यास गेले मात्र तो पसार झाला. आरोपीच्या घराची झडती घेतली असता मयताच्या रक्ताचे डाग व आवश्यक पुरावे प्राप्त झाले. आरोपी हा मुंबई येथे फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मुंबईतून दोघांना अटक

त्यानुसार पोलीस पथक मुंबई येथे आरोपी पकडण्यास गेले असता त्याने तेथूनही पळ काढला. मात्र पोलिसांनी शिताफीने त्याचा शोध घेऊन चार्ल्स माडर, सलोमी पेडराई या दोघांना अटक करून नेरळ पोलीस ठाण्यात आणले. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर आपण हत्या केल्याचे आरोपींनी कबूल केले.

पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेतल्याने केली हत्या

आरोपी चार्ल्स माडर, सलोमी पेडराई आणि मयत सुशीलकुमार सरनाईक हे तिघे मित्र होते. 16 डिसेंबर रोजी आरोपी आणि मयत यांनी मद्यप्राशन केले. यावेळी मयत सुशीलकुमार याने आरोपी याच्या पतीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. याचा राग आरोपीला आल्याने सुशीलकुमार याची हत्या करून शरीराचे तुकडे करून गटारात फेकून दिले.

24 तासात पोलिसांनी केला तपास

कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांनी तपास केलेला असून सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकामी पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर, सहा.पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, पोलीसउपनिरीक्षक गिरीष भालचिम, पोलीस उपनिरीक्षक सचिन गावडे, सहा.फौजदार गणेश गिरी, सहा.फौजदार ठमके, पोहवा अविनाश वाघमारे, पोहवा संदिप नरुटे,पोहवा रतन बागुल, पोहवा नवनाथ म्हात्रे, पोहवा निलेश सुखदेवे, पोहवा राहुल मुनेश्वर, पोहवा देवेंद्र शिनगारे, पोना शरद फरांदे, पोना सचिन नरुटे, पोना निलेश वाणी, पोशि घनश्याम पालवे, पोशि प्रशांत बेले, पोशि वैभव बारगजे, पोशि केशव नागरगोजे, पोशि शेखर मोरे, पोशि एकनाथ गर्जे, पोशि बंडू सुळ, पोशि अप्पा मोरेमपोशि वैशाली ढवाळकर, मपोशि सोनू मेश्राम, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील सपोनि श्रीकृष्ण नावले, पोलीस उपनिरीक्षक महेश कदम व त्यांचे पोलीस पथक यांनी कामगिरी केलेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details