रायगड - कर्जत तालुक्यात काही दिवसांपासून विवाहबाह्य प्रेमसंबंधातून युगुलांनी आपले जीवन संपवण्याच्या घटना घडत आहे. विवाहित महिलेने प्रियकराबरोबर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नेरळातील भांडवल दामात कातकरी वाडी येथे घडली. सीमा पालकर आणि समीर पवार अशी मृतांची नावे आहेत.समीर पवार हा अविवाहित असून तो कर्जत येथील बांबनोली येथे राहत होता. त्याचे नेरळ येथील दामात वाडी येथे राहणारी सीमा पालकर या विवाहित महिलेवर प्रेम होते.
विवाहित महिलेची प्रियकराबरोबर गळफास घेऊन माहेरात आत्महत्या - Raigad Suicide
आज सकाळी १० वाजले तरी दोघे उठत नसल्याने घरातील मंडळींनी दरवाजा उघडला असता दोघेजण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.
सीमा ही समीरच्या संपर्कात आल्यापासून ते दोघे एकत्र राहत होते. काही दिवसापासून सीमा आणि समीर हे नेरळला तिच्या आईच्या घरी राहण्यासाठी आले होते. आज सकाळी 10 वाजले तरी दोघे उठत नसल्याने घरातील मंडळींनी दरवाजा उघडला असता दोघेजण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.
सीमा पालकर ही विवाहित असून नवऱ्यापासून ती वर्षभर दूर होती. नवऱ्यापासून तिला दोन मुले होती. मोठा मुलगा हा नवऱ्या जवळ राहत असून लहान मुलगा हा सीमा हिच्याकडे राहत होता.
नेरळ हादरून टाकणाऱ्या या प्रकरणाचा नेरळ पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रेमी युगुलाच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.