रायगड-मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच काही ठिकाणी पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. मात्र दुसरीकडे खालापूरमध्ये दररोज शेकडो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे समोर आले आहे. शासकीय विश्रामगृहाच्या शेजारून गेलेली पाईपलाईन फुटल्याने, शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, पाईपलाईन दुरुस्तीची मागणी होत आहे.
खालापूर तालुक्यात उन्ह्याळ्यामध्ये दरवर्षी पाणीटंचाई जाणवते, पाणीटंचाई दूर करण्यासाठी सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून प्रयत्न केले जात आहेत. मात्र असे असतानाही पाईपलाईन फूटल्याने शेकडो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पाईपलाईन दुरुस्त करण्याची मागणी
खालापूरमध्ये पाईपलाईन फूटल्याने शेकडो लिटर पाणी वाया जात आहे, तालुका पाणीटंचाईचा सामना करत असताना, प्रशासनाला पाण्याचे महत्त्व लक्षात येत नाही का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून तातडीने पाईपलाईन दुरुस्त करावी अशी मागणी देखील नागरिक करत आहेत.