रायगड -17 एप्रिल ते 19 एप्रिल या तीन दिवसांचा झालेला जनता कर्फ्यू व त्यानंतर संपूर्ण लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने आज खोपोलीत बाजारात प्रचंड गर्दी झाली. या गर्दीने सोशल डिस्टन्सिंग व कोविड नियमांचा फज्जा उडाला. गर्दीने तीन दिवसीय जनता कर्फ्यूवर पाणी फेरल्याचे चित्र निर्माण झाले होते.
गर्दीचे दृष्य आणि माहिती देताना शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार नविनचंद्र घाटवल हेही वाचा -मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर गुंडांची पोलिसांशी हुज्जत; हत्यारे असलेली कार सोडून फरार
कोरोनाचे लोकांना भय नाही
जनता कर्फ्यूमुळे तीन दिवस खोपोली पूर्णपणे बंद होती. आज सकाळी नियमितपणे दुकाने, भाजी, मटण, चिकन मार्केट सुरू होताच नागरिकांची प्रचंड गर्दी निर्माण झाली. दरम्यान, रात्री जागोजागी बॅरिकेडिंगमुळे खोपोली शहरात संपूर्ण लॉकडाऊन लागण्याचे चित्र निर्माण झाल्याने कसलीही पर्वा न करता शहरातील नागरिक आवश्यक सामान खरेदीसाठी घरा बाहेर पडले. त्यामुळेच, भाजीपाला मार्केट, मटण-चिकन मार्केट, फळ मार्केटसह अन्य सर्व ठिकाणी नागरिकांची तुफान गर्दी झाली.
सोशल डिस्टन्सिंग व कोविड नियमांचा फज्जा
गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंग व कोविड नियमांचा फज्जा उडाला. शेवटी पोलीस व नगरपालिका कर्मचाऱ्यांनी फेरफटका मारून गर्दी कमी करण्याचे आवाहन केले. मात्र, याचा फार फरक पडल्याचे दिसले नाही. जनता कर्फ्यू नंतर अचानक गर्दी होऊन फज्जा होऊ शकतो, अशी भीती काही वास्तविक जाणीव असलेल्या कार्यकर्त्यांनी वर्तवली होती. ती आज झालेल्या गर्दीने खरी ठरली.
हेही वाचा -अलिबागेमध्ये लॉकडाऊन आता अधिक कडक