महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

म्हाडाने तळीये गावातील घरांची पुनर्बांधणी कालमर्यादेत करण्याचे गृहनिर्माणमंत्र्यांचे निर्देश - Raigad news

रायगड जिल्ह्यातील तळीये गावातील सर्व सातही वाड्यांमधील एकूण 261 घरांची पुनर्बांधणी म्हाडाने विहित काल मर्यादेत पूर्ण करावी, असे निर्देश गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहेत

जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड

By

Published : Aug 17, 2021, 10:12 PM IST

मुंबई -रायगड जिल्ह्यातील तळीये गावातील सर्व सातही वाड्यांमधील एकूण 261 घरांची पुनर्बांधणी म्हाडाने विहित काल मर्यादेत पूर्ण करावी, असे निर्देश गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहेत. तळीये गावाच्या पुनर्वसनासंदर्भात मंगळवारी (दि. 17 ऑगस्ट) मंत्रालयात गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्योग राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांची उपस्थिती होती.

तळीये गावातील घरांच्या पुनर्बांधणीसाठी मदत व पुनर्वसन विभागाने म्हाडास जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच रस्ते, वीज, पाणी, शाळा, अंगणवाडी, समाजमंदिर, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाने म्हाडास आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा. त्यानुसार म्हाडाने लेआऊट तयार करून त्याचा विकास एजन्सी म्हणून करावा. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी पुढील आठवड्यात तळीये येथे जाऊन जागेची पाहणी करावी, असे निर्देशही आव्हाड यांनी यावेळी दिले.

यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर,मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता,रायगडच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष मुख्याधिकारी योगेश म्हसे, म्हाडाच्या कोकण मंडळाचे मुख्याधिकारी डॉ. नितीन महाजन, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्याधिकारी अरुण डोंगरे,उपसचिव सुनील तुंबारे उपस्थित होते.

हेही वाचा -मुंबई पालिकेतील भंगार विक्रीत घोटाळा; भाजप नगरसेवक विनोद मिश्रांचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details