महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 14, 2021, 7:28 PM IST

ETV Bharat / state

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातग्रस्तांच्या मदतीला धावणारा हॉटेल व्यावसायिक!

आज कोरोना या आजाराने नाती दुरावली, गाव दुरावले असे चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे. परंतु अशा वातावरणातही काही लोक कायम सेवा करण्याच्या भुमिकेत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी येथील हॉटेल व्यावसायिक कल्पेश ठाकूर कायम सक्रिय असतात.

हॉटेल व्यावसायिक कल्पेश ठाकूर
हॉटेल व्यावसायिक कल्पेश ठाकूर

रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर अपघातग्रस्तांना मागील सोळा वर्षांपासून विनामूल्य सेवा देणारा पेण येथील कल्पेश ठाकूर आता कोरोना रुग्णांसाठी देखील विनामूल्य सेवा देत आहे. त्यांच्या तो 'देवदूत' ठरला आहे. कोरोना महामारीने मागील वर्षीपासून संपुर्ण जगात थैमान घातले आहे. आज या रोगाने नाती दुरावली, गाव दुरावले असे चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे. आपले म्हणणारेही या कोरोनाच्या भीतीने लांब गेले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णाकडे सगळे पाठ फिरवत आहेत. या रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहीका सेवा देण्यासाठी कल्पेश पुढे आला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी नेहमीच तो पुढाकार घेत असतो.

'रायगड भूषण' पुरस्कारासह 'देवदूत' यासारख्या पुरस्कारांनी गौरव'

अपघातग्रस्तांची विनामूल्य मदत करणाऱ्या कल्पेश ठाकूर यांच्या 'साई सहारा प्रतिष्ठान पेणच्या' अत्याधुनिक रुग्णवाहीकेचे लोकार्पण जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते झाले होते. यानंतर जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीत 200 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांना पेण ते अलिबाग, पनवेल, नवी मुंबई ते मुंबई, विनामूल्य सेवा देण्याचे कार्य सुरू आहे. आपला हॉटेल व्यवसाय सांभाळत असतानाच कोरोना ग्रस्तांच्या मदतीला कल्पेशने नेहमीच धाव घेतली आहे. गाडीला लागणारे डिजेल असो किंवा चालकाचा पगार व गाडीचे छोटे-मोठे काम असो कल्पेश स्वतःच्या खर्चाने करत आहे. एखाद्यावेळी रुग्णवाहिकेवर चालक नसला तरी स्वतः चालकाची भूमिका निभावून रुग्णाला सेवा देण्या तो करत आहे. कल्पेशच्या या कार्याची दखल घेऊन त्याला 'रायगड भूषण' पुरस्कारासह 'देवदूत' यासारख्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. अपघातग्रस्त व कोरोनाग्रस्तांना मदत लागल्यानंतर (9225714555)या मोबाईल नंबरवर तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन कल्पेशने केले आहे.

'कोरोना रुग्णांपासून दूर पाळणारे लोक पाहिले'

माझा हॉटेल व्यवसाय आहे. हा व्यवसाय सांभाळत असताना मी अनेक अपघात होताना पाहिले आहेत. या अपघात झालेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. हे बघून मी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आलो. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुबईहुन कोकणात व कोकणातून परराज्यात पायी चालत जाणाऱ्या वाटसरूंना अन्नदान केले. यावेळी कोरोना रुग्णांपासून दूर पाळणारे माणसं मी बघितली आहेत. त्यामुळे दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची होणारी परवड बघून या रुग्णांसाठी रुग्णवाहिका घेतली आहे. कोरोना रुग्ण व अपघातग्रस्तांकडून कोणताही मोबदला न घेता तीन रुग्णवाहिकेतून ही मोफत सेवा आजही सुरु आहे. अशी प्रतिक्रिया कल्पेश ठाकूर यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details