महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिखले गावात कूपनलिकेतून गरम पाणी, ग्रामस्थांमध्ये कुतूहल - गरम पाणी

चिखले केंद्र शाळेच्या आवारातील कूपनलिकेत शनिवारी सकाळपासून गरम पाणी येऊ लागल्याने नागरिकांमध्ये कुतूहल आहे. याबाबत माहिती मिळताच तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांनी याठिकाणी भेट देवून पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.

ratnagiri
चिखले गावात कूपनलिकेतून गरम पाणी

By

Published : Dec 30, 2019, 9:19 AM IST

रायगड -डहाणू तालुक्यातील चिखले केंद्र शाळेच्या आवारातील कूपनलिकेतून शनिवारी सकाळी गरम पाणी येण्यास सुरुवात झाली. हे पाहण्यासाठी रविवारी दिवसभर नागरिकांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान, डहाणू तहसीलदार राहुल सारंग, गटविकास अधिकारी बी. एच. भरक्षे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. गेल्या ३ महिन्यांच्या कालावधीतील ही दुसऱ्यांदा पुनरावृत्ती असून यामुळे नागरिकांमध्ये कुतूहल व्यक्त होत आहे.

चिखले गावात कूपनलिकेतून गरम पाणी

शनिवारी सकाळी या कूपनलिकेतून गरम पाणी निघत असल्याचा अनुभव काही ग्रामस्थांना आला होता. मात्र, सायंकाळपासून हे पाहण्यासाठी गर्दी वाढू लागली, ती रविवारी पूर्ण दिवस होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सूचना फलक लावण्यात आला. दरम्यान रविवारी दुपारी दीडच्या सुमारास डहाणू तहसीलदार राहुल सारंग, गटविकास अधिकारी बी.एच. भरक्षे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पाणी नमुने गोळा करण्यासह, भूगर्भ तसेच जिल्हा आपत्ती विभागाला प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details