पनवेल - पनवेल शहराला मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. बेलापूर गावातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तसेच या पावसाचा तडाखा वाहतूक व्यवस्थेलाही बसला असून पनवेल बस डेपोमध्ये पाणी साचले होते, यामुळे लांब पल्ल्याच्या बसची प्रतिक्षा करणाऱ्या प्रवाशांना बस डेपोमध्येच अडकून रहावे लागले.
पनवेलला पावसाचा तडाखा, अनेक ठिकाणी रस्त्यावर साचले पाणी - कळंबोली
रस्त्यावर पाण्याचा निचरा नीट होत नसल्याने काही भागामध्ये अर्ध्या फुटापर्यंत पाणी साचले होते. यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. पावसाळ्यात वाहने घसरण्याच्या भीतीने तसेच साचलेल्या पाण्यात रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहन चालक कमी वेगात वाहन चालवित होते. या पावसामुळे रात्रभर वीज पुरवठा खंडीत झाला होता.
मुसळधार पावसामुळे खारघर, कळंबोली, कामोठे, नविन पनवेल, कुंभारवाडा, ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग, पायोनिअर, मिडलक्लास सोसायटी, तालुका पोलीस ठाणे परिसरात पाणी साचले होते. या मुसळधार पावसामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूकही मंदावली आहे. पनवेलमध्ये कळंबोली पुलाखाली पाणी साचल्याने, तसेच खांदेश्वर रेल्वे स्थानकाच्या भुयारी मार्गात पाणी साचल्यामुळे दोन्ही मार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरही रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्याने रेल्वे प्रवाशांचा खोळंबा झाला.