रायगड - जिल्ह्यात आज (गुरुवार) दुपारनंतर पावसाने हजेरी लावली असून पावसाची संततधार सुरू आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला असून, 24 तासात सरासरी 29.49 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. श्रीवर्धनमध्ये सर्वाधिक 167 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पाऊस सुरू झाल्याने आता शेतीच्या कामालाही वेग आला आहे. 17 ते 19 जूनपर्यत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.
रायगड जिल्ह्यात दुपारनंतर पावसाची हजेरी, दिवसभरात सरासरी 29 मीमी पावसाची नोंद - रायगड पाऊस न्यूज
रायगड जिल्ह्यात आज दुपारनंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वाचावरणात गारवा निर्माण झाला आहे. गेल्या 24 तासात सरासरी 29.49 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 29.49 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच 1 जूनपासून आज अखेर एकूण सरासरी 363.36 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज जिल्ह्यात अलिबाग 2.00 मि.मि., पेण-9.00 मि.मि., मुरुड-24.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-2.50 मि.मि., कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-7.00 मि.मि., माणगांव-36.00 मि.मि., रोहा-11.00 मि.मि., सुधागड-14.00 मि.मि., तळा-30.00 मि.मि., महाड-30.00 मि.मि., पोलादपूर-51.00, म्हसळा-88.00 मि.मि., श्रीवर्धन-167.00 मि.मि., माथेरान-0.40 मि.मि., पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यत 471.90 मि.मि. पाऊस पडला असून त्याची सरासरी 29.49 मि. मि. इतकी आहे.