महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडमध्ये अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; अडीच हजार नागरिकांचे विस्थापन - अलिबाग पाऊस

जिल्ह्यात गेले २४ तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरी वस्तीत पाणी  शिरत आहे. जिल्ह्यात पावसाच्या हाहाःकाराने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुसळधार पावसाने जिल्ह्यात हाहाकार

By

Published : Aug 4, 2019, 10:29 PM IST

रायगड -जिल्ह्यात गेले २४ तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरीवस्तीत पाणी शिरत आहे. जिल्ह्यातील अडीच हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अनेक ठिकाणी झाडे, घरे, दरडी कोसळल्याच्या घचना घडल्या आहेत. तर, काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुसळधार पावसाने जिल्ह्यात हाहाःकार

शाळांना सुट्टी जाहीर केली असून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. नदी व समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. जिल्ह्यातील अलिबाग, पेण, रोहा, नागोठणे, महाड, पोलादपूर, उरण, कर्जत, माणगाव, श्रीवर्धन हे तालुके पुरमय झाले आहेत. महाड, पोलादपूर या तालुक्यात रस्ते वाहून गेले आहेत.

तर, मुरुड तालुक्यात साळवमध्ये डोंगर कोसळून मातीचा ढिगारा रस्त्यावर आला होता. पेण मधील कणे गावात अडकलेल्या ग्रामस्थांना एनडीआरएफच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जिल्ह्यातील अनेक पुलांवर पाणी साचल्याने वाहतूक बंद झाली. कोकण रेल्वेही दरड कोसळल्याने काही काळ ठप्प झाली होती. जिल्ह्यात पावसाच्या हाहाःकाराने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details