रायगड- हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. 1 ऑगस्ट पासून जिल्ह्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचेही हवामान विभागाने कळविले आहे. समुद्रकिनारी तसेच नदी किनारी गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
जिल्ह्यातील अनेक भागात सकाळपासून पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. जिल्ह्यातील नद्या तुडूंब वाहत असल्या तरी धोक्याच्या पातळी खालून वाहत आहेत. मात्र दिवसभर पाऊस राहिल्यास कुंडलिका, सावित्री नद्या या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस... सतर्कतेचा इशारा - रायगड पाऊस बातमी
जिल्ह्यातील अनेक भागात सकाळपासून पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. जिल्ह्यातील नद्या तुडूंब वाहत असल्या तरी धोक्याच्या पातळी खालून वाहत आहेत. मात्र दिवसभर पाऊस राहिल्यास कुंडलिका, सावित्री नद्या या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस...
मुसळधार पाऊस सुरू झाल्याने समुद्र किनारी तसेच नदीकिनारी असणाऱ्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. सर्व यंत्रणांनाही सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. जिल्ह्यात पडत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.