आरोपीच्या वकिलांनी आजची सुनावणी रद्द करण्याबाबतचा अर्ज न्यायलायने फेटाळला
पुनर्विचार याचिकेवर आरोपी नितेश सरडा याच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू
दुपारी 3 नंतर जामीन अर्जावर होणार सुनावणी
रायगड - जिल्हा सत्र न्यायालयात अर्णब गोस्वामींच्या न्यायालयीन कोठडीबाबत रायगड पोलिसांनी केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी सुरू झाली आहे. पोलिसांच्या पुनर्विचार याचिकेवर आरोपी नितेश सरडा यांचा युक्तिवाद सुरू आहे. तसचे अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर आज दुपारी ३ वाजल्यानंतर सुनावणी होईल. आज जिल्हा सत्र न्यायालयात आणि उच्च न्यायालयात दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकल्यावर न्यायालय अर्णब गोस्वामी यांना न्यायालयीन कोठडी, पोलीस कोठडी की जामीन देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अर्णब गोस्वीमींच्या जामीन अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सरकारपक्षातर्फे शनिवारी युक्तिवाद पूर्ण -
रायगड पोलिसांनी अर्णब यांच्या न्यायालयीन कोठडीबाबत दिलेल्या आव्हानावर विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी 7 नोव्हेंबरला युक्तिवाद पूर्ण केला आहे. या युक्तिवादात आरोपी पक्षातर्फे दिलेले म्हणणे अॅड. प्रदीप घरत यांनी खोडले असून अर्णब यांना पोलीस कोठडी का द्यावी, याबाबत युक्तिवाद केला होता. न्यायालयाने सरकार पक्षातर्फे केलेला युक्तिवाद ऐकून 9 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी ठेवली होती.
हेही वाचा -अर्णब गोस्वामींनी मोबाईल वापरल्याची बाब समोर; तळोजा कारागृहात हलवले
आरोपी पक्षातर्फे आज होणार युक्तिवाद -
सरकार पक्षातर्फे शनिवारी युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आज आरोपींचे वकील न्यायालयासमोर युक्तिवाद करत आहेत. जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जे. मल्लशेट्टी यांच्या न्यायालयात ही सुनावणी पार पडत आहे.
अर्णव गोस्वामींचा जामीन अर्ज आज दाखल करण्याची शक्यता -
अर्णब गोस्वामी यांनी अलिबाग न्यायालयात केलेला जामीन अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयात जामीन अर्ज करण्याबाबत निर्देश दिले होते.
अर्णब गोस्वामी यांना आज दिलासा मिळणार की नाही -
सत्र न्यायाधीश आर जे मल्लशेट्टी यांच्या न्यायालयात पोलिसांच्या पुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी होत आहे. दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून न्यायालय निर्णय देणार आहेत. उच्च न्यायालयाने चार दिवसात निर्णय देण्याचे निर्देश सत्र न्यायालयाला दिले आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीवर अर्णब गोस्वामी यांना दिलासा मिळणार की अडचणी वाढणार हे कळणार आहे.
हेही वाचा -'रिपब्लिक टीव्ही'चे संपादक अर्णब गोस्वामींना अटक!