रायगड -माथेरान नगरपरिषदेतील शिवसेनेच्या दहा नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजप प्रवेशाबाबत शिवसेना सचिव अनिल देसाई आणि गटनेते प्रसाद सावंत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आक्षेप नोंदविला आहे. भाजपात प्रवेश केलेल्या त्या दहा नगरसेवकांना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अनर्हतेची नोटीस बजावली आहे. याबाबत आज 30 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली होती. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आजची सुनावणी पुढे ढकलली असून, आता 5 जुलैला सुनावणी होणार आहे. भाजपचे दहाही नगरसेवक आपल्या वकीलासोबत आज सुनावणीला हजर होते. तर माथेरानच्या नगराध्यक्षा आणि गटनेते हेसुद्धा वकीलांसोबत हजर होते.
- 27 मे रोजी केला होता भाजपात प्रवेश -
माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेत गटनेते प्रसाद सावंत आणि नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून शिवसेनेच्या दहा नगरसेवकांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली. 27 मे रोजी कोल्हापूर येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यामुळे माथेरान नगरपरिषदेत राजकीय बॉम्ब फुटला. शिवसेनेची सत्ता ही माथेरानमध्ये अल्पमतात आली असली तरी थेट नगराध्यक्ष हा शिवसेनेचा असल्याने अद्यापही माथेरान नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे.
हेही वाचा -विधानसभा अध्यक्ष पदाबाबत राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांना स्मरण पत्र
- पुढील सुनावणी 5 जुलैला