रायगड- जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच आरोग्य यंत्रणेतील कर्मचार्यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन कक्षात काम करणाऱ्या दोन आरोग्य सेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांना आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोन आरोग्य सेवकांना कोरोनाची लागण - Raigad corona news
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांना अलिबाग येथील आयसोलेशन वॉर्डात उपचारासाठी ठेवण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत अलिबागमध्ये पन्नासच्यावर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आयसोलेशन कक्षात कोरोनाबाधितांशी थेट संपर्क आला असल्याने दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.
यापूर्वी महाड व कर्जत येथील नर्स तसेच कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील 2 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेतील सहा जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांना अलिबाग येथील आयसोलेशन वॉर्डात उपचारासाठी ठेवण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत अलिबागमध्ये पन्नासच्यावर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आयसोलेशन कक्षात कोरोनाबाधितांशी थेट संपर्क आला असल्याने या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.
या आरोग्य सेवकांवर अलिबाग येथील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. तर त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन त्यांचेही स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक प्रमोद गवई यांनी दिली.