महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुर्गम भागात ऑनलाईन शिक्षणाची समस्या; मात्र, मुख्याध्यापकाच्या माध्यमातून वाहतेय 'ऑफलाईन' ज्ञानगंगा - zp school roha aatone raigad

रोहा तालुक्यात चिंचवलीतर्फे आतोने या दुर्गम क्षेत्रात जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. या शाळेत 63 जणांचा विद्यार्थीपट आहे. ही शाळा डोंगर दऱ्याच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात आहे. या शाळेचे मुख्याध्यापक गजानन जाधव आहेत. या दुर्गम भागात मोबाईलला रेंजही नाही. त्यातच विद्यार्थ्याचे पालक हे निरक्षर आहेत. त्यांच्याकडे मोबाईलही नाहीत.

head master teaching at students home in raigad
ऑनलाईन शिक्षणाची समस्या, मुख्याध्यापक घरोघरी जाऊन देतायेत शिक्षणाचे धडे

By

Published : Jul 21, 2020, 12:53 PM IST

रायगड -कोरोना महासंकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद आहेत. यामुळे विद्यार्थी मोबाईल, लॅपटॉपच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. मात्र, आदिवासी वाडीवरील विद्यार्थ्यांकडे मोबाईल सुविधा नसल्याने त्यांच्या शिक्षणामध्ये अडचणी येत आहेत. मात्र, रोहा तालुक्यातील दुर्गम क्षेत्र असलेल्या चिंचवलीतील आतोने शाळेतील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हा प्रश्न शाळेचे मुख्यध्यापक गजानन जाधव यांनी सोडविला आहे.

रोहा तालुक्यात चिंचवलीतर्फे आतोने या दुर्गम क्षेत्रात जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. या शाळेत 63 जणांचा विद्यार्थीपट आहे. ही शाळा डोंगर दऱ्याच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात आहे. या शाळेचे मुख्याध्यापक गजानन जाधव आहेत. या दुर्गम भागात मोबाईलला रेंजही नाही. त्यातच विद्यार्थ्याचे पालक हे निरक्षर आहेत. त्यांच्याकडे मोबाईलही नाहीत. त्यामुळे या आदिवासी वाडीवरील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकेही देण्यात आली असली तरी पालक हे निरक्षर असल्याने अभ्यास घेणे शक्य नव्हते.

ही बाब लक्षात घेऊन मुख्यध्यापक गजानन जाधव यांनी आपले शिक्षक सहकारी जगन्नाथ अब्दागिरे यांच्या मदतीने आदिवासी वाडीवर येऊन विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन पुस्तकाच्या माध्यमातून अभ्यास घेत आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण घेता येत नसले तरी गजानन जाधव यांच्यासारखे शिक्षक हे आपल्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकाच्या माध्यमातून ऑफलाइन अभ्यास शिकवीत आहेत. तर जाधव यांच्यासोबत त्यांचे सहकारी जगन्नाथ अब्दागिरे हे एक शिक्षकही विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.

दुर्गम भागात ऑनलाईन शिक्षणाची समस्या; मात्र, मुख्याध्यापकाच्या माध्यमातून वाहतेय 'ऑफलाईन' ज्ञानगंगा

शाळेची पूर्ण इमारत 3 जूनला झालेल्या निसर्ग चक्रीवादळात कोसळली आहे. त्यामुळे गावातील मंदिरात शाळेचे साहित्य ठेवण्यात आले आहे. निसर्ग चक्रीवादळाबरोबर कोरोनाचे संकटही असल्याने सध्या शाळा बंद आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत सरकारने ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. जाधव यांच्या घरापासून ही शाळा दहा किलोमीटर अतंरावर आहे. मात्र, ते डोंगर-दरी, नदी ओलांडून पावसात चिखलात रस्ता पार करतात आणि विद्यार्थ्यांना ज्ञानदान करीत आहेत. त्यामुळे आदिवासी वाडीवरील शाळेतील विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसले तरी गजानन जाधव सारखे शिक्षक हे शिक्षणामध्ये एक आदर्श निर्माण करीत आहेत.

  • काय म्हणाले जाधव? -

कोरोनामुळे शाळा बंद आहेत. यामुळे अनेक ठिकाणी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मात्र, माझी शाळा ही दुर्गम भागात आहे. याठिकाणी ऑनलाइन शिक्षण शक्य नाही. विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये, यासाठी मी आणि माझे शिक्षक आम्ही रोज येऊन या मुलांचा अभ्यास घेत आहोत.

- गजानन जाधव (मुख्याध्यापक, जि. प. शाळा आतोने)

ABOUT THE AUTHOR

...view details