पनवेल - ऐन गर्दीच्या वेळी सकाळी मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. अद्यापही २० ते २५ मिनिटांनी लोकल उशिराने धावत आहेत. हार्बर मार्गावर कॉटन ग्रीन ते शिवडी स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने पनवेल जंक्शनवर गर्दी
पनवेलहून सीएसएमटीकडे जाणारी हार्बर रेल्वेची वाहतूक जवळपास २५ मिनिटे उशिराने सुरू आहे. त्यामुळे नोकरदारांना सकाळपासूनच कामावर जाण्याच्या वेळी मनस्ताप सहन करावा लागला.
पनवेलहून सीएसएमटीकडे जाणारी हार्बर रेल्वेची वाहतूक जवळपास २५ मिनिटे उशिराने सुरू आहे. त्यामुळे नोकरदारांना सकाळपासूनच कामावर जाण्याच्या वेळी मनस्ताप सहन करावा लागल आहे. पनवेलहून सकाळी ९:१५ वाजता सुटणारी लोकल शिवडी- कॉटनग्रीन स्थानका दरम्यान बंद पडली होती. त्यामुळे हार्बर रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली. बिघाड दुरुस्ती केल्यानंतर १० वाजून ५ मिनिटांनी रेल्वेसेवा सुरळीत झाली. मात्र, त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी हार्बर आणि मध्य रेल्वेमार्गांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती.
लोकलच्या दिरंगाईने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना आणि विद्यार्थ्यांना प्रचंड गर्दीतूनच धक्केबुक्के खात प्रवास करावा लागला.