जिल्ह्याचे पालकमंत्री गेले कुठे? पूरग्रस्त रायगडकरांना पडला प्रश्न - पालकमंत्री रवींद्र चव्हाण
रायगड जिल्ह्यात सर्वत्र पावसाने धुमाकुळ घातला आहे. जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी करोडोंची वित्तहानी झाली आहे. रायगडकरांना मदतीची गरज असताना, जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेले पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे मात्र जिल्ह्यात फिरकलेच नाहीत.
जिल्ह्याचे पालकमंत्री गेले कुठे? पूरग्रस्त रायगडकरांना पडला प्रश्न
रायगड - जिल्ह्यात आठवडाभरा पासून मुसळधार पाऊस व पुर परिस्थिती आहे. जिल्हा प्रशासन सर्वत्र लक्ष ठेऊन काळजीपुर्वक परिस्थिती हाताळत आहेत. जिल्ह्याचे पालक असलेले पालकमंत्री रवींद्र चव्हाण, यांना मात्र जिल्ह्यातील पूर परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. रवींद्र चव्हाण अजूनही जिल्ह्यात आलेले नाहीत. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या अशा वागण्यावर रायगडकर नाराजी व्यक्त करीत आहेत.