महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालकमंत्री आदिती तटकरे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची पेणला भेट - पेण आदिवासी मुलीवर बलात्कार रायगड

पेणमधील एका गावात तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पीडित कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केले.

रायगड
रायगड

By

Published : Dec 30, 2020, 8:22 PM IST

रायगड- पेण येथे आदिवासी मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. या घटनेनंतर पालकमंत्री आदिती तटकरे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पेणच्या संबंधित गावात भेट देऊन पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले. घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून दोन्ही लोकप्रतिनिधींनी खेद व्यक्त केला. आरोपीला कठोरात-कठोर शिक्षा व्हावी, ही जशी पीडित कुटुंबाची, नागरिकांची मागणी आहे, तशीच या जिल्ह्याची नागरिक म्हणून माझी देखील आहे, असे सांगून आरोपीला कडक शासन होण्यासाठी सर्व ती पावले उचलली जातील, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. तर या गुन्ह्याचा खटला जलदगती न्यायलायत चालवून विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.

रायगड

अशा घटनांबाबत आम्ही सरकारसोबत - विरोधी पक्षनेते
पेणमधील एका गावात तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांची भेट घेऊन घटनेची माहिती दिली. अशा वारंवार होणाऱ्या घटनांना लगाम घालणे गरजेचे आहे. यासाठी शक्ती कायदा आणत आहोत. मात्र, असणारे कायदे अमलात आणले जात नाहीत. याविषयाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी मिळून लक्ष दिले पाहिजे, आम्ही विरोधक असलो तरी सरकार सोबत आहोत, अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली.
कठोरात-कठोर शिक्षा व्हावी ही माझीही मागणी - पालकमंत्री
रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनीही पीडित मुलीच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या झालेला गुन्हा जलद गतीने चालविण्यात येणार आहे. तसेच गुन्हेगाराला कठोरात-कठोर शिक्षा व्हावी, अशी कुटुंबाची आणि रायगडकरांची मागणी आहे आणि माझीही. अशा घटनांना आळा बसविण्यासाठी कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे, जेणेकरून पुन्हा कोणी असा अपराध करणार नाही, अशी प्रतिक्रिया आदिती तटकरे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details