रायगड - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमिताने बाबासाहेबांची कर्मभुमी असलेल्या महाडमधील चवदार तळ्यावर मेणबत्त्यांची रोशणाई करित महामानवाला आदरांजली वाहण्यात आली. यानिमित्ताने चवदार चळ्याच्या संरक्षण भिंती, हॉल परिसरात एक हजार 164 मेणबत्त्या लावण्यात आल्या. दलित मित्र महादेव खांबे गुरुजी ट्रस्टने हा उपक्रम आयोजित केला होता.
आंबेडकर अनुयायी याबाबत प्रतिक्रिया देताना. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे केअरटेकर चंपासिंग थापा यांनी केले अभिवादन -
शिवसेना प्रमुख बाळासाहेब याचे केअरटेकर चंपासिंग थापा यांनीही आज चवदार तळे येथे येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले. पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार भरत गोगावले यांच्यासह शेकडो अनुयायांनी येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले.
बाबासाहेबांना अभिवादन करताना पालकमंत्री अदिती तटकरे आणि इतर आंबेडकर अनुयायी. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेय चवदार तळे -
महाड शहरातील चवदार तळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ठिकाण आहे. चवदार तळ्याचे पाणी हे सर्वांना पिण्यासाठी खुले करण्यासाठी बाबासाहेब यांनी सत्याग्रह केला होता. त्यानंतर चवदार तळ्याचे पाणी हे सर्वांना पिण्यास खुले झाले. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिवस असल्याने चवदार तळ्यावर शेकडो अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी याठिकाणी गर्दी केली होती.
हेही वाचा -महापरिनिर्वाण दिन विशेष : नव्या पिढीनं शिकून मोठं व्हावं - कडूबाई खरात यांचं आवाहन
एक हजार चौसष्ट मेणबत्याची रोषणाई -
6 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता दलित मित्र महादेव खांबे गुरुजी ट्रस्टने चवदार तळे येथे एक हजार चौसष्ट मेणबत्या परिसरात लावल्या. त्यामुळे रात्रीच्या अंधारात चवदार तळे परिसर मेणबत्तीच्या रोषणाईने झगमगले होते. शेकडो आंबेडकर अनुयायी या उपक्रमात सहभागी झाले. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना आणि भिमस्तृती देखिल यावेळी गायली गेली.