महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत मतमोजणीला सुरुवात

जिल्ह्यातील ७९ सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

Raigad

By

Published : Feb 25, 2019, 2:59 PM IST

रायगड- जिल्ह्यातील ७९ सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अलिबाग तालुक्यात सर्वाधिक २५ ग्रामपंचायतीचा निकाल असल्याने येथील मतमोजणी नेहुलीच्या क्रीडा संकुलमध्ये होत आहे.

उमेदवारांची संख्या मोठी असल्याने मतमोजणी सुरू होण्यास वेळ लागत आहे. तर कार्यकर्त्यांनी मतमोजणी ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याने पोलिसांवर ताण पडला आहे. मतमोजणी यंत्रणा सज्ज असली तरी उमेदवार व प्रतिनिधींचा उत्साह अनावर झाल्याने मतमोजणी प्रक्रियेला उशीर होत आहे.

सकाळी साडेदहा वाजता तहसीलदार कार्यालयात मतमोजणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील ७९ सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या ३०० मतदान केंद्रावर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. ७९ सरपंचपदासाठी २२६ उमेदवार रिंगणात असून ६८९ सदस्य पदासाठी १ हजार ६३१ उमेदवार आहेत. सकाळी साडेदहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असली तरी अलिबागमध्ये अद्यापही मतमोजणीला सुरुवात झालेली नाही.

उमेदवार व प्रतिनिधी मतमोजणीच्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर मतमोजणीला सुरुवात केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. मात्र, उमेदवार हे घाई गडबड करत असल्याने मतमोजणी थांबवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर ठिकाणंचा निकाल लवकर लागला तरी अलिबागमधील निकाल लागण्यास ४ ते ५ वाजतील, असे दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details