रायगड - पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे खून प्रकरणात आज अलिबाग सत्र न्यायालयात सरकार पक्षातर्फे आरोप निश्चितीपूर्वीचा युक्तीवाद मांडण्यात आला. विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी सत्र न्यायाधीश मलशेट्टी यांच्यासमोर हा युक्तीवाद केला. बचाव पक्षाला आरोप निश्चितीपूर्वीचा युक्तीवाद करण्यासाठी ३ जून ही तारीख निश्चित केली आहे.
अश्विनी बिद्रे खून प्रकरण: सरकारीपक्षाने आरोप निश्चितीपूर्वीचा युक्तीवाद न्यायालयात मांडला - prosecutor
पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे खून प्रकरणात आज अलिबाग सत्र न्यायालयात सरकार पक्षातर्फे आरोप निश्चितीपूर्वीचा युक्तीवाद मांडण्यात आला.
यापूर्वीच्या तीन तारखांना पोलीस अधिकारी न्यायालयात हजर राहीले नव्हते. त्यामुळे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसे, पत्र नवी मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवले होते. त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त अजय कदम यांनी प्रदीप घरत यांची भेट घेवून तपासात पूर्णपणे सहकार्य करण्याचे मान्य केले. त्यानुसार आज पोलीस अधिकारी न्यायालयात हजर होते. आज सरकारी वकिलांनी आरोपींवर कोणते आरोप निश्चित करावयाचे याबाबत न्यायालयासमोर आपला युक्तीवाद केला.
पोलीसांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर एसीपी अजय कदम तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. त्यानुसार आज पोलीस अधिकारी न्यायालयात हजर होते. सरकारी पक्षाचा आरोप निश्चितीपूर्वीचा युक्तीवाद पूर्ण झाला असून आता ३ जूनला बचाव पक्षातर्फे युक्तीवाद केला जाणार आहे.