महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सीमा शुल्क अधिक्षकाची समुद्रात उडी मारून आत्महत्या - officer suicide in sea at JNPT

सीमा शुल्क अधिक्षकाने समुद्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मानसिक दडपणामुळे आत्महत्या केल्याचे कारण सांगण्यात येत आहे. जेएनपीटी बंदराच्या जेट्टीवरून उडी घेऊन आत्महत्या झाली. बोटीतील प्रवाशांनी वाचवण्याचा प्रयत्न केला पण यात ते यशस्वी झाले नाहीत.

Government officer suicide in sea at JNPT
सीमा शुल्क अधिक्षकाची समुद्रात उडी मारून आत्महत्या

By

Published : May 4, 2020, 7:02 PM IST

रायगड : सीमा शुल्क विभागात अधिक्षक पदावर काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने जेएनपीटी बंदराच्या जेटीवरून समुद्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दि. ३ मे रोजी घडली. बिनोय नायर असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.

आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले, तरी मानसिक दडपणामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जेएनपीटी प्रवासी जेट्टीवरील कामगारांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत न्हावा शेवा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details