रायगड - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी संसदेत अर्थसंकल्प मांडला. यात शेतकऱ्यांसाठी खर्च शून्य (झिरो बजेट) शेतीला प्राधान्य दिले आहे. मात्र, खर्च शून्य शेती म्हणजे काय? हे अगोदर शेतकऱ्यांना सांगण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.
'झिरो बजेट' शेती कशी करावी हे आधी शेतकऱ्यांना सांगा, शेतकऱ्यांनी उपस्थित केले असे प्रश्न - रायगड बातम्या
शासनाने आधी माहिती देणे गरजेचे आहे. तरच शून्य खर्च शेती हा प्रकार काय आहे, हे सर्वसामान्य शेतकऱ्याला कळू शकेल, असे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.
सध्या शेती करणे परवडत नाही. मी माझ्या शेतात रासायनिक खते वापरत नाही. सेंद्रिय शेती करतो. मात्र, तरीही शेतीचे उत्पन्न हे खर्चापेक्षा कमीच मिळत आहे, असे महेंद्र भोईर या शेतकऱ्याचे म्हणणे आहे.
खर्च शून्य शेती म्हणजे काय? हेच आमच्या सारख्या शेतकऱ्यांना माहीत नाही. या पद्धतीच्या शेतीची घोषणा करताना त्याबाबत शेतकऱ्याला माहिती असणे गरजेचे आहे. शासनाने आधी माहिती देणे गरजेचे आहे. तरच शेतीचा हा प्रकार काय आहे, हे सर्वसामान्य शेतकऱ्याला कळू शकेल, असे मत भोईर यांनी मांडले.