रायगड - शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी आज बुधवारी राज्यभर संप पुकारला गेला. रायगड जिल्ह्यातही शासकीय कर्मचारी या संपात सहभागी झाले. शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात शासकीय कर्मचारी प्रमाणेच कोळी बांधवही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा हेही वाचा... राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा 'धुरळा', नागपुरात गडकरींसह फडणवीसांना धक्का
रायगड जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांनी एलईडी, पर्ससीन नेट अशा आधुनिक मच्छीमारीवर बंदी आणण्यासाठी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यामुळे बुधवारचा दिवस हा मोर्चाचा दिवस ठरला. रायगड जिल्ह्यात मोर्चे काढण्याच आले, तरी बंदला अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते.
हेही वाचा... 'भाजप सरकारकडून गुंडाना खुले संरक्षण'
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या असून, याबाबत एक दिवसाचा संप पुकारला होता. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच अन्य शासकीय कर्मचारी या संपात सहभागी झाले. त्यामुळे गजबजलेल्या शासकीय कार्यालयात आज शुकशुकाट पाहायला मिळाला. बँकेचे कर्मचारीही संपात सहभागी असल्याने बँकेचे व्यवहार ठप्प झाले होते. याचा फटका ग्राहकांना बसला. जिल्हा परिषदेचे कर्मचारी या संपात सहभागी झाले नसले, तरी काळ्या फिती लावून संपाला प्रतिसाद दिला.
हेही वाचा... देशव्यापी संपात बँक कर्मचारी संघटनांचा सहभाग; बँकेच्या सेवा विस्कळीत
जिल्ह्यातील काही भागात बाजारपेठा बंद करण्यात आलेल्या होत्या. मच्छीमार कोळी बांधवांनीही आधुनिक मच्छीमारीवर बंदी करण्यासाठी मोर्चा काढला. त्यामुळे अलिबागमध्ये एकाचवेळी मच्छीमार, शासकीय कर्मचारी यांचे मोर्चे निघाले होते. पोलिसांनी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आलेले दोन्हीही मोर्चे पोलिसांनी अरुणकुमार वैद्य हायस्कुल जवळ अडवले. त्यानंतर दोन्ही मोर्चेकरांच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले.