महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जेएनपीटीमध्ये वाहतूकदारांचा संप यशस्वी; नवी मुंबई अन् रायगडमध्ये वाहतूककोंडी

अखिल महाराष्ट्र राज्य मोटार मालक संघ आणि जेएनपीटी वाहतूकदार बचाव समन्वय समितीच्या वाहतूकदारांनी पुकारलेला संप यशस्वी ठरला. संपाचा सर्वात जास्त फटका नवी मुंबई आणि रायगडमधील लघुउद्योगांना बसला.

जेएनपीटीमध्ये वाहतूकदारांचा संप यशस्वी; नवी मुंबई अन् रायगडमध्ये वाहतूककोंडी

By

Published : Oct 5, 2019, 8:37 PM IST

रायगड - जवाहरलाल नेहरू बंदराकडे (जेएनपीटी) जाणाऱ्या रस्त्यांवर खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. तसेच मालवाहू वाहनांना मुख्य मार्गावर प्रवेश बंदी आणि दंडात्मक कारवाई होत आहे. त्यामुळे नवी मुंबई व रायगडमधील वाहतूक संघटनांच्यावतीने संप पुकारण्यात आला. यामुळे नवी मुंबई आणि रायगडमधील जवळपास २६ हजार ट्रक रस्त्यावर थांबली होती.

जेएनपीटीमध्ये वाहतूकदारांचा संप यशस्वी; नवी मुंबई अन् रायगडमध्ये वाहतूककोंडी

अखिल महाराष्ट्र राज्य मोटार मालक संघ आणि जेएनपीटी वाहतूकदार बचाव समन्वय समितीच्या वाहतूकदारांनी पुकारलेला संप यशस्वी ठरला. संपाचा सर्वात जास्त फटका नवी मुंबई आणि रायगडमधील लघुउद्योगांना बसला. संपामुळे माल पुरवठा होत नसल्याने लघुउद्योजकांचे करोडेचे नुकसान झाले. जेएनपीटी येथे दररोज साधारण 8000 ते 10,000 एक्सपोट व इम्पोर्ट गाड्या ये जा करतात. त्या पूर्णपणे बंद असल्याने जेएनपीटीचे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले होते.

ई-चालानमध्ये पारदर्शकता आणून त्यानंतरच कारवाई करण्यात यावी, न्हावा-शेवा पोर्ट परिसरातील सीएफएस व एमटी कंटेनर यार्ड यांच्याकडे स्वत:ची पार्किंग नसल्याने होणारी कारवाई वाहतूकदारांवर न करता संबंधितांवर करावी. संबंधित यार्डला पार्किंग उपलब्ध करून देण्यात यावी. जेएनपीटी प्रशासनाने त्यांच्या परिसरामध्ये वाहनास विनाशुल्क पार्किंगसाठी प्लॉट उपलब्ध करून वाहतूकतळ निर्माण करावेत, अशा प्रमुख मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता.

संपाचा लघुउद्योजकांना फटका -
मालवाहतूकदारांचा संप अद्यापही सुरूच आहे. या संपामुळे औद्योगिक उत्पादनावरही परिणाम होत आहे. जेएनपीटी आणि तळोजा एमआयडीसी परिसरातील कंपन्यांना याचा फटका बसला आहे. आशियातील एकूण समुद्री माल वाहतुकीच्या जवळपास ४० टक्के वाहतूक या बंदरातून होते. मात्र, आजच्या माल वाहतूकदारांच्या संपामुळे कंपन्याचा माल गोदामात पडून आहे.

मालवाहतूक कंपन्यात रोजंदारीवर काम करणाऱ्या हमालांचीही त्यामुळे उपासमार सुरू झाली आहे. माल वाहतुकदारांच्या समस्या सरकारने लवकरात लवकर सोडवल्या नाहीतर संपाचे आंदोलनात रुपांतर करू, असा इशारा देखील महाराष्ट्र मोटार मालक संघटनेचे अध्यक्ष भरत पोखरकर यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details