महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तरुणावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या पनवेलच्या नगरसेवक पुत्रांना अद्याप अटक नाही - पनवेल तरूणावर जीवघणा हल्ला

पनवेलचे गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या मुलांनी एका तरुणाच्या डोक्यात आठ बियरच्या बाटल्या फोडून जीवघेणा हल्ला केल्याची घटना गेल्या शनिवारी रात्री घडली होती. या घटनेला एक आठवडा उलटून गेला, तरी गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांची मुलं अजूनही मोकाटच आहेत.

पिडीत तरुण

By

Published : Aug 14, 2019, 11:52 PM IST

रायगड -पनवेलचे गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या मुलांनी एका तरुणाच्या डोक्यात आठ बियरच्या बाटल्या फोडून जीवघेणा हल्ला केल्याची घटना गेल्या शनिवारी रात्री घडली होती. यात पीडित तरुणाच्या डोक्याला जबर मार लागला असुन तो मृत्यूशी झुंज देत आहे. घटना होऊन ५-६ दिवस उलटले तरीही कळंबोली पोलीस आरोपींना अटक करू शकले नाहीत.

एक आठवडा उलटला तरी तरुणावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक नाही
सुरुवातीला कळंबोली पोलिसांनी याबाबत कलम 307 न लावता केवळ हाणामारीचा गुन्हा दाखल केला होता. नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या मुलांना झुकते माप दिले होते. याबाबत 'ईटीव्ही भारत' ने बातमी लावून पीडित तरुणाच्या कुटुंबियांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर कळंबोली पोलीस खडबडून जागे झाले. तरुणावर हल्ला करणाऱ्या जगदीश गायकवाड यांच्या मुलांवर कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला. सिद्धार्थ गायकवाड या तरुणाला काही दिवसांपूर्वी नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या मुलांनी जुजबी कारणावरुन मारले होते. यानंतर त्याने कळंबोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. मात्र आम्ही नगरसेवकाची मुले असल्यामुळे आमच्या विरोधात कोण कशी काय तक्रार करु शकतो? अशा वल्गना करत जगदीश गायकवाड यांची मुले सिध्दार्थला शोधत होती. मात्र तो हाती न लागल्यामुळे त्याचा भाऊ विश्वनाथवर आरोपींनी राग काढला.रोडपाली येथील एका बार समोर नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या तीन मुलांसह अन्य चार ते पाच जणांनी विश्वनाथवर जीवघेणा हल्ला केला. यावेळी विश्वनाथ याच्या डोक्यावर त्यांनी बियारच्या बाटल्या आणि ग्लास फोडले. यामध्ये विश्वनाथ हा गंभीररित्या जखमी झाला.या घटनेला एक आठवडा उलटून गेला, तरी गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांची मुलं अजूनही मोकाटच आहे. राजकीय पाठबळ व पोलिसांची कृपादृष्टी यामुळे सध्या हे गुंड शिरजोर, तर पीडित कुटुंब दहशतीखाली अशी उलट परिस्थिती असल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details