रायगड- मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील भोगाव (येलंगेवाडी) येथील रस्ता 28 जुलै रोजी पावसाने खचला होता. त्यामुळे एका बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 29 जुलै रोजी हा रस्ता दुरुस्त करणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली असून दोन्ही बाजूने वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटातील खचलेला रस्ता पूर्ववत - raigad
मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील भोगाव येथील रस्ता 28 जुलै रोजी पावसाने खचला होता.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली असून दोन्ही बाजूने वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली आहे.

जिल्ह्यात दोन दिवसात पडलेल्या पावसाने कहर केला असून अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. पोलादपूर तालुक्यातही मुसळधार पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे येथेही अनेक भागात पाणी साचले होते. मुंबई गोवा महामार्गालाही या पावसाचा फटका बसला आहे.
मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटानजीक असलेल्या मौजे भोगाव येलंगेवाडी येथील एक साईटचा रस्ता हा पूर्ण खचला गेला होता. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या वाहनांना अपघाताची शक्यता निर्माण झाली हाती. त्यामुळे या महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरळीत सुरू ठेवली होती. महामार्गाच्या या परिस्थितीबाबत कशेडी येथील हायवे पोलीस चौकीला माहिती देऊन सतर्कते बाबत सूचना दिल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभाग महाडचे उपअभियंता गायकवाड यांनाही याबाबत कळविले होते. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली असून मुंबई गोवा महामार्गावरील दुतर्फा वाहतूक भोगाव या रस्त्यावरून सुरू झाली आहे.